Citizens expressed anger at the public relations program : तिरोड्यात रंगला प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी वाद
Gondia भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी तिरोडा तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांवर थेट संवाद साधण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले. मात्र, हा दरबार ऐन वेळेला प्रशासनाच्या विचित्र निर्णयामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
डॉ. पडोळे यांनी प्रशासनाला जनता दरबार घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांनी २७ एप्रिल रोजी आदेश काढून २८ एप्रिलला कार्यक्रमाचे आयोजन निश्चित केले. मात्र अवघ्या काही तासांतच आदेश मागे घेत प्रशासनाने दरबार रद्द केल्याचे जाहीर केले. त्यामुळे ठरलेला दरबार गुंडाळण्यात आला आणि नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. विशेष म्हणजे, प्रशासनाच्या गैरहजेरीतही डॉ. पडोळे यांनी पंचायत समितीच्या खुल्या आवारात दरबार भरवत जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या, ज्यातून त्यांचा जनतेशी असलेला थेट संपर्क स्पष्टपणे दिसून आला.
Illegal Sand Smuggling : वाघ दिसताच वाळू तस्कराला फुटला घाम!
दरबारात नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, शेतकऱ्यांच्या पिकासाठी सिंचनाची समस्या, अंगणवाडी सेविका भरतीमधील गोंधळ आणि घरकुल योजना थांबलेल्या हप्त्यांची तक्रार मांडली. यावर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन खासदारांनी दिले. या सगळ्या घडामोडींमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, उपविभागीय अधिकाऱ्यांचा निर्णय हा प्रशासनाचा लोकशाही व्यवस्थेवरील अनादर असल्याची भावना नागरिकांमध्ये प्रबळ झाली आहे.
डॉ. पडोळे यांची सक्रियता आणि नागरिकांच्या प्रश्नांवर घेतलेली तत्काळ दखल हा राजकारणात सकारात्मकतेचा एक आदर्श ठरू शकतो. याउलट प्रशासनाचा गोंधळट निर्णय हा लोकसेवेच्या मूलभूत तत्त्वांना छेद देणारा ठरला आहे. प्रशासनाने जर लोकप्रतिनिधींशी समन्वय साधला असता तर जनता दरबार अधिक प्रभावी ठरू शकला असता.
Local Body Election : साखरपुडा, लग्न, वाढदिवसांमध्ये दिसताहेत नेते!
ही घटना केवळ तिरोडा तालुक्यापुरती मर्यादित नाही. संपूर्ण जिल्ह्यातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या नात्यातील ताणतणावाचे प्रतिबिंब दर्शवते. अशा घटना जर वेळोवेळी घडत राहिल्या, तर सामान्य नागरिकांचा शासकीय यंत्रणेवरील विश्वास उध्वस्त होण्याची भीती आहे.