Breaking

MP Sanjay Deshmukh : खासदार साहेब, तुम्ही यवतमाळात स्थायिक होणार होते ना?

The MPs did not keep their promise to settle in Yavatmal : संजय देशमुखांची प्रतीक्षा; प्रत्येक कामासाठी लोकांना जावे लागते दिग्रसला

Yavatmal लोकसभा निवडणूक कालावधीमध्ये विजयी झाल्यानंतर यवतमाळात स्थायिक होणार, असा शब्द खासदार संजय देशमुख यांनी दिला होता. निवडणूक झाली, निकाल लागला. देशमुख मोठ्या मताधिक्क्याने विजयी केले. मात्र, आठ महिने लोटूनही ते यवतमाळ येथे स्थायिक झालेले नाहीत. त्यांचे साथे जनसंपर्क कार्यालयही शहरामध्ये नाही. त्यामुळे त्यांनी आपला शब्द फिरविल्याची भावना जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

यवतमाळकरांना खासदारांच्या संर्पकासाठी दिग्रसची वाट धारावी लागत आहे. मतदारांना उलट्या प्रवासाचा मनस्तापही सहन करावा लागत आहे. संजय देशमुख दिग्रस विधानसभेतील रहिवासी आहे. त्याच मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढण्याची मनिषा ठेवून त्यांची तयारी सुरू होती. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी उबाठा गटात प्रवेश केला. त्यातून राजकारणाची नवी घडी बसविली. नंतर त्यांना २०२४ मध्ये यवतमाळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची संधी चालून आली.

Sahasram Korote : काँग्रेसने मला अंधारात ठेवले, विश्वासघात केला !

उमेदवारी दाखल केल्यानंतर निवडणुकीसाठी त्यांनी कंबर कसून प्रचारास सुरुवात केली. त्यावेळी यवतमाळ येथे स्थायीक होवून जिल्हावासीयांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिली होते. लोहारा येथे आपली जागा असून तेथे घर बांधून स्थायीक होण्याचा शब्द त्यांनी दिला. यवतमाळ येथे स्थानिक पातळीवर देशमुख यांचे कार्यालय राहील, अशी अपेक्षा होती.

त्यामुळे संजय देशमुख यांच्यावर विश्वास ठेऊन मतदारांनी त्यांना भरभरून मतदान केले. विजयानंतर पुढील दोन महिन्यात खासदार यवतमाळ येथे राहायला येतील किंवा किमान त्यांचे जनसंपर्क कार्यालय येथे उभे करतील, मतदारांना अपेक्षा होती. मात्र, अजूनही त्यांच्या कार्यालयाचा ठावठिकाणा नाही.

Collector of Amravati : सण असो वा उत्सव, भोंग्याच्या आवाजाला असेल Limit !

आठ महिने लोटूनही खासदार संजय देशमुख यांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सााधे टिनपत्र्याचे कार्यालय येथे उभे केले नाह. ज्यांना खासदारांना भेटून आपली समस्या मांडायची आहे, त्यांना सरळ दिग्रसची वाट धरावी लागते. तेथे पोहचल्यावर खासदार भेटले तर ठीक, नाही तर निराश होऊन परतीची वाट धरावी लागते. त्याचा मनस्ताप आता मतदार संपातील नागरिकांना होत आहे. त्यामुळे खासदारांनी आपला शब्द फिरविल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण झाली आहे.