MP Supriya Sule : ‘खामगाव नगराध्यक्ष अविरोध’ म्हणत सभागृहाची दिशाभूल?

Misleading the house by claiming ‘Khamgaon Municipal President elected unopposed’ : खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान वादाच्या भोवऱ्यात

Khamgao नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपकडून ‘भव्य प्रमाणात घराणेशाही’ झाल्याचा आरोप करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील सभागृहात केलेले विधान आता वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी खामगाव नगरपालिकेचा उल्लेख करत “कॅबिनेट मंत्र्यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर अविरोध निवडून आल्या, कोणालाच फॉर्म भरू दिला नाही” असे सांगितले. पण प्रत्यक्षात खामगावात त्रिकोणी लढत होत असल्याने त्यांच्या विधानावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

खरे चित्र — खामगावात अविरोध नव्हे, सरळसरळ निवडणूक लढत!

खामगाव नगराध्यक्षपदी भाजपाच्या उमेदवार सौ. अपर्णा सागर फुंडकर या कॅबिनेट मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांच्या वहिनी आहेत.
मात्र त्यांच्या विरोधात—

Minister Aditi Tatkare accused of arbitrary functioning : बाल संगोपन योजना राबविताना बाहेरील जिल्ह्यांना प्राधान्य?

राष्ट्रीय काँग्रेस: सौ. स्मिता किशोर भोसले

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): सौ. चेतना शर्मा

या दोघी उमेदवारांनी थेट मुकाबला दिला आहे. २ डिसेंबरला मतदान पार पडले असून निकाल २१ डिसेंबरला जाहीर होणार आहे.

सभागृहातील विधानाचा व्हिडिओ चर्चेत

सुप्रिया सुळे यांनी बोलताना खामगावचा उल्लेख करत असे म्हटले—
“खामगाव में कॅबिनेट मंत्री की भाभी अविरोध चुनकर आई, किसी को फॉर्म भी भरने नहीं दिया गया.”
सभागृहातील या वक्तव्याचा व्हिडिओही समोर आला असून त्यावरूनच खामगावमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

दिशाभूल की चुकीची माहिती?

जनतेच्या अपेक्षेनुसार, खासदाराने सभागृहात तथ्यपूर्ण माहिती मांडणे अत्यावश्यक असते.
परंतु—

खामगावात अविरोध निवडणूक झाली नाही,

तीन पक्षांच्या महिला उमेदवारांमध्ये सरळ संघर्ष सुरू आहे,

हे वास्तव असताना सुळे यांच्या विधानाने दिशाभूल झाली का? असा प्रश्न स्थानिक राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहे.

Mahavitaran : ‘दिवसा वीज द्या’, वन्यप्राण्यांच्या धोक्याने शेतकरी संतप्त

खामगावात चर्चांचा विषय

“अविरोध निवडून आल्या? मग आमचे मतदान कशासाठी?”,
“प्रत्यक्ष लढत असताना अविरोधचा उल्लेख का?”
असे प्रश्न मतदारांमध्ये उपस्थित होत आहेत.