MSRTC : बनावट ओळखपत्रांवर लुटल्या सवलती, ८० प्रवाशांवर कारवाई

Action against 80 passengers who availed concessions using fake I-cards : फौजदारीची टांगती तलवार, एसटीची ‘पंचसूत्री’ मोहिम

Buldhana राज्य परिवहन महामंडळाच्या सेवांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि उत्पन्नातील गळती रोखण्यासाठी बुलढाणा आगाराने चालविलेल्या ‘पंचसुत्री’ विशेष मोहिमेने मोठा भेद उघड केला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवासातील सवलती घेणाऱ्या ८० प्रवाशांना अवघ्या पाच दिवसांत दणका बसवण्यात आला असून अनेकांचे बोगस ओळखपत्रे जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर बनावट कार्डधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विभाग नियंत्रण अधिकारी शुभांगी सिरसाठ आणि विभागीय वाहतूक अधिकारी दिगांबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, बुलढाणा बसस्थानक प्रमुख रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वातील पथकाने ही मोहीम व्यापकपणे राबविली. ‘पंचसुत्री’ कार्यक्रमात बसेसची वेळेवर सुटका, प्रवाशांना योग्य सवलती देणे, नियमित तपासणी आणि बोगस कार्डांची पकड या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.

soybean procurement process : हमीभाव दराने सोयाबीन खरेदी नावापुरती

बुलढाणा विभागातील विविध मार्गांवर तपासणी करताना केवळ पाच दिवसांतच ८० प्रवाशांकडून बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली. अनेकांनी सवलतीसाठी बनावट विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक किंवा इतर श्रेणींची ओळखपत्रे वापरल्याचे समोर आले.

जप्त करण्यात आलेली बोगस ओळखपत्रे विभागीय कार्यालयात जमा करून त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सुपूर्द केली जाणार आहेत. शासनाची फसवणूक झाल्याने संबंधितांवर फौजदारी गुन्हे नोंदवले जाऊ शकतात, अशी माहिती मिळते.

MAHATMA GANDHI NATIONAL RURAL EMPLOYMENT GUARANTEE SCHEME : मनरेगांतर्गत वैयक्तिक कामांची मर्यादा सात लाखांपर्यंत!

“बनावट ओळखपत्रामुळे शासनाची फसवणूक होते आणि एसटीच्या उत्पन्नात घट होते. योग्य लाभार्थ्याला सेवा देताना अडचणी निर्माण होतात. म्हणूनच अशा प्रवाशांवर कारवाई यापुढेही कठोरपणे केली जाणार आहे,” असे बुलढाणा बसस्थानक प्रमुख रामकृष्ण पवार यांनी सांगितले.