ST employees give strike warning right at Diwali time : प्रलंबित आर्थिक मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप
Mumbai ग्रामीण महाराष्ट्रातील नागरिकांच्या अडचणींमध्ये दिवाळीच्या तोंडावर भर पडण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिल्याने गाव-शहराचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याआधीही एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या काळात आंदोलन छेडले होते. जवळपास महिनाभर चाललेल्या त्या संपामुळे ग्रामीण भागाचा तालुका व जिल्ह्यांशी थेट संपर्क खंडित झाला होता. आजही ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एसटी हीच मुख्य वाहतूक सुविधा आहे. खासगी वाहनांच्या अव्वाच्या सव्वा दरामुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक बोजा पडला होता. त्यामुळे दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात एसटी संपाची पुनरावृत्ती होऊ नये, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
Bacchu Kadu : नेत्यांची ‘तोडफोडी’ची भाषा, शेतकरी आंदोलन चर्चेत
एसटी कर्मचाऱ्यांचा दावा आहे की, त्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेने या पार्श्वभूमीवर आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा दिला आहे. हे आंदोलन मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयात करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
RTO Checkpost : अदानीचा ‘सद्भाव’ संपला, चेकपोस्टवरून बिनधास्त सुरू आहे ओव्हलोड वाहतूक !
सरकारने या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून लक्ष न दिल्यास ऐन दिवाळीत संप अटळ असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यामुळे शहरातून गावाकडे सणानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनाच मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढील निर्णय काय असणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.