Breaking

MSRTC : ST कर्मचाऱ्यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा!

ST employees warn of hunger strike again : कामगार सेना महाराष्ट्र दिनी उपोषणाच्या तयारीत

Buldhana राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागातील कामगारांवरील अन्याय आणि प्रशासकीय हलगर्जीपणाविरोधात एस.टी. कामगार सेनेने १ मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मागण्या ३० एप्रिल २०२५ पर्यंत मान्य न झाल्यास हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सेनेचे राज्य उपाध्यक्ष गजानन माने यांनी स्पष्ट केले.

या मागण्यांसंदर्भात ४ फेब्रुवारी २०२५ रोजी विभाग नियंत्रकांना निवेदन दिले गेले होते. मात्र, आजपर्यंत यावर कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. वेळोवेळी संपर्क साधूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले, असा आरोप कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

२७ नोव्हेंबर २०२४ रोजी कामगिरीवर पाठविण्यात आलेल्या चालक-वाहकांना मेहकर आगारात पुनर्नियुक्त करावे. सहाय्यक वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक परीक्षा उत्तीर्ण चालक-वाहक यांना तात्काळ पदोन्नती द्यावी. चिखली आणि बुलडाणा आगारात निवडक कर्मचाऱ्यांना पुन्हा पुन्हा एकच कामगिरी देणे आणि आतीकालीक भत्त्यात दुजाभाव थांबवावा, या मागण्या करण्यात आल्या आहेत.

Buldhana Jigaon Project : बुलढाण्यातील जिगाव प्रकल्पासाठी मंगळवारी मुंबईत बैठक !

चालक-वाहकांना १५ दिवसांची कार्यपद्धती (१५ दिवस चालक, १५ दिवस वाहक) काटेकोरपणे राबवावी.बुलडाणा आगारात आणि बस स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची तातडीने सोय करावी.विनंती बदलीने आलेल्या कामगारांना जवळच्या आगारात नियुक्त करावे. आलोकेशन वेळेत करावे, खोडतोड थांबवावी आणि नियोजनशून्यतेमुळे कामगिरी न मिळालेल्या कर्मचाऱ्यांना हजेरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Jammu Kashmir terrorist attack : काश्मीरचं सौंदर्य घायाळ करणारं, पण आता ‘घायाळ’ व्हायला जाणार कोण ?

शेगाव आगारात चालक विरकर कोणत्या नियमाने आलोकेशन करत आहेत, याचा खुलासा करावा आणि त्यांची तात्काळ बदली करावी. कर्मचाऱ्यांचे ग्रेडेशन, वार्षिक वेतनवाढ आणि प्रलंबित वैद्यकीय बिले त्वरित अदा करावीत. खामगाव आगारातील कर्मचारी माणिक गोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी रंजीत सपकाळ यांच्यावर कठोर कार्यवाही करावी, या मागण्यांचाही समावेश आहे.