The issue of stalled promotions finally resolved : महामंडळाच्या अकोला विभागाची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली
Akola सन २०२० पासून अकोला विभागात बिंदू नामावली अद्ययावत किंवा प्रमाणित नसल्यामुळे तत्कालीन विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातील सरळ सेवा भरती, बदली, अनुकंपा नियुक्ती, खात्यांतर्गत पदोन्नती परीक्षा आणि पदोन्नतीची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यामुळे अकोला विभागातील तसेच बाहेरून बदलीसाठी पात्र असलेल्या कामगारांचे मोठे नुकसान होत होते. मात्र, अनेक वर्षांपासून हा प्रश्न आता मार्गी लागला आहे.
या अन्यायकारक स्थितीविरोधात सर्वात प्रथम आणि शेवटपर्यंत महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेने ठाम भूमिका घेतली. संघटनेने हा मुद्दा लोकप्रतिनिधींकडे मांडला. त्यानंतर अमरावती विभागाच्या उपआयुक्तांसोबत बैठक झाली. कार्यवाहीचे आदेशही देण्यात आले होते. दरम्यानच्या काळात प्रक्रिया रखडली होती. मात्र १२ ऑगस्ट २०२५ च्या शासनादेशानुसार अकोला विभागात पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यामुळे पदोन्नतीपासून वंचित असलेल्या कामगारांना आता लाभ मिळणार आहे.
Maharashtra politics : महायुती सरकारला मित्रपक्षांच्या वादग्रस्त नेत्यांचा फटका
काही शिल्लक त्रुटी पूर्ण होताच अकोला विभागाची बिंदू नामावली अद्ययावत व प्रमाणित होईल आणि सरळ सेवा भरती, बदली तसेच अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया सुकर होईल.
या कार्यात आमदार रणधीरजी सावरकर, आमदार श्याम खोडे, आमदार सईताई डहाके, विभागीय आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त, अमरावती, तसेच माधवजी कुसेकर (उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक), मोहनदासजी भरसट (महाव्यवस्थापक, क.व.औ.सं.), रोहनजी पलंगे (प्रादेशिक व्यवस्थापक), विलासजी राठोड (विभाग नियंत्रक) आणि शर्मा मॅडम (विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी) यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेतर्फे संदीपजी शिंदे (केंद्रीय अध्यक्ष), हनुमंतरावजी ताटे (जनरल सेक्रेटरी), विकासजी डुबुले (राज्य उपाध्यक्ष), रूपम वाघमारे (विभागीय सचिव), गणेश डांगे (विभागीय अध्यक्ष), पवन शिंदे (विभागीय कार्याध्यक्ष), मनीष तिवारी (विभागीय कोषाध्यक्ष) तसेच विविध डेपो पदाधिकारी आणि सभासदांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
Political controversy : ‘जनाची नाही तर मनाची तरी ठेवा’, अजित पवारांवरच घसरले विखे-पाटील!
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पदोन्नती प्रक्रियेला आता गती मिळाल्याने अकोला विभागातील एस.टी. कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.