Devendra Fadnavis Delivered Strong Performance as Chief Minister : देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उत्तम काम केले
Nagpur : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पुन्हा सरसावले आहेत. ओबीसीच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांनी हट्ट धरला आहे. पण असे करण्यास कुणीही तयार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा प्रकारे मराठ्यांना आरक्षण देण्यास असमर्थता दर्शवली आहे. अशात नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांचे विधान महत्वाचे ठरत आहे.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना राजे मुधोजी भोसले म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको आहे. मराठा समाजाला वेगल्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी आमची मागणी आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण हवे आहे. त्यासठी ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्याची गरज नाही. मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी भूमिका मुधोजी राजे भोसले यांनी स्पष्ट केली आहे.
Maharashtra politics : देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी …
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र ओबीसींच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही विरोध करतो, असे मुधोजी राजे म्हणाले. मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात जे काम केले, ते खरंच कौतुकास्पद आहे. आता न्यायालयात टिकेल, असे आरक्षण मराठा समाजाला हवे आहे. याच मागणीवर मराठा समाज ठाम आहे, असेही मुधोजी राजे भोसले यांनी सांगितले.
आता मनोज जरांगे यांचे आंदोलन आणि त्यावरून आक्रमक झालेला ओबीसी समाज यातून सरकार कोणता सुवर्णमध्य साधणार, याकडे तमाम ओबीसी आणि मराठा समाजबांधवांचे लक्ष लागलेले आहे.








