Confusion about whether the period of traineeship will be extended or not : युवा प्रशिक्षणार्थींची साद; कार्यकाळ वाढण्याच्या संदर्भात संभ्रम
Akola मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्ह्यात 2,697 प्रशिक्षणार्थी विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत. मात्र, त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपत असून, महायुती सरकारने अद्याप तो वाढवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पुन्हा बेरोजगार होण्याची भीती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी युवा प्रशिक्षणार्थींनी “मायबाप सरकार, करू नका आम्हाला पुन्हा बेरोजगार” अशा मागणीचे फलक हातात घेत शहरातून मूकमोर्चा काढला आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचा मूकमोर्चा स्वराज भवनातून निघाला. यावेळी “रोजगार कायमस्वरूपी हवा,” “कार्यकाळ वाढवा,” “विद्यावेतन वाढवा” अशा मागण्या करणारे फलक प्रशिक्षणार्थींनी हातात घेतले होते.
Vidarbha Farmers : शेतकऱ्यांभोवती पुन्हा अवैध सावकारीचा फास !
सहा महिन्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याच आस्थापनेत कायम करण्यात यावे. कार्यकाळ व विद्यावेतनात वाढ करावी. शासकीय विभागाच्या परीक्षाभर्तीमध्ये प्रशिक्षणार्थींसाठी 10 टक्के आरक्षण द्यावे, अशा मागण्या या प्रशिक्षणार्थींनी सरकारकडे केल्या आहेत.
योजना संपल्यानंतर पुढे काय करावे, असा प्रश्न या युवकांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा युवा प्रशिक्षणार्थींनी दिला आहे.
Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : शिवसेनेचे वाशिम बसस्थानकात आंदोलन
सरकारच्या निर्णयाकडे लक्ष
तरुणांच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने सरकारने ही योजना आणली होती. पण आता या प्रशिक्षणार्थिंचा कालावधी वाढला नाही तर मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे त्यांना भविष्याची चिंता वाटत आहे. अशात सरकार नवीन काही योजना यांच्यासाठी आणते की कालावधी वाढवून देते, याकडे लक्ष लागले आहे. या तरुणांना वाऱ्यावर सोडल्यास सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होऊ शकतो.