Triangular equation heats up in Mumbai Municipal Corporation elections : मुंबई महापालिका निवडणुकीत त्रिकोणी समीकरण तापले
Mumbai: मुंबई महापालिका निवडणुकीची रंगत चांगलीच वाढत असून महायुतीतले अंतर्गत वाद आता स्पष्टपणे समोर येऊ लागले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या हालचालींमुळे आधीच नाराज असल्याचे संकेत अनेकदा मिळाले आहेत. त्यात आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नव्या राजकीय डावाने शिंदे सेनेला घेरण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. हा डाव म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत आखलेली रणनीती. ठाकरे बंधूंच्या जवळकीनंतर मुंबईत निर्माण होणारे नवे गणित शिंदे गटासाठी मोठे आव्हान ठरणार असल्याची चर्चा आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे सेना विरुद्ध मनसे अशी थेट लढत होण्याची शक्यता सूत्रांकडून पुढे येत आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे गटासोबत गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये मनसे आपली ताकद दाखवणार असल्याचे संकेत आहेत. महायुतीकडून शिंदे गटाला काही प्रभाग सोडले जाणार असल्यास त्याच प्रभागांमध्ये उद्धव ठाकरे गट मनसेला जागा देण्याचा विचार करत असल्याची माहितीही पुढे येत आहे. यामुळे शिंदे गटाला आपल्या पारंपारिक मतदारसंघांतच थेट स्पर्धेला तोंड देण्याची वेळ येऊ शकते.
Local body election : अज्ञातस्थळी गेलेले राष्ट्रवादीचे सहा मुस्लिम उमेदवार परतले !
2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुंबईत दोन शिवसेना गटांची सरळ टक्कर होती. परंतु यावर्षी मे महिन्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर समीकरणे बदलली. त्यानंतर मनसेने मुंबईत तब्बल 75 जागांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मनसेने मागणी केलेल्या प्रभागांमध्ये शिंदे गटाचे माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे उद्धव सेनेचा हा ‘मनसे’ डाव शिंदे सेनेच्या घावावर मीठ चोळणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
Local body election : ‘ऑपरेशन लोटस’ने शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली !
या नव्या राजकीय डावपेचात दोन पातळ्यांवर खेळ मांडला जात आहे. एकीकडे मनसे शिंदे गटाच्या उमेदवारांच्या मतांत खिंडार पाडेल, तर दुसरीकडे भाजपविरोधात उमेदवार उभे करून उद्धव ठाकरे गट भाजपालाही रोखण्याचा प्रयत्न करेल. शिंदे गटाचे शिवसैनिक जर पर्याय म्हणून मनसेकडे वळले तर शिंदे उमेदवारांचे मतविभाजन होऊ शकते. त्याचबरोबर महायुतीतील नाराज शिवसैनिकांची मते उद्धव ठाकरे गटाकडे जाण्याची दाट शक्यताही सूत्रे व्यक्त करत आहेत.
Candidates car accident : शिंदे गटाच्या उमेदवाराच्या कारची भरधाव धडक
सध्या शिंदे गट आणि भाजप यांच्यातील तणाव दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत उद्धव सेना आणि मनसेची जुळलेली नवी सांठगाठ, शिंदे गटासाठी सर्वात अवघड निवडणूक परिस्थिती निर्माण करू शकते. मुंबई महापालिका निवडणुकीत निर्माण होणारे हे नवे त्रिकोणी समीकरणउद्धव सेना, मनसे आणि शिंदे गट राजकीय तापमान कमालीचे वाढवणार आहे, हे निश्चित झाले आहे.
______








