Shiv Sena leader Sanjay Raut’s big statement will offer relationship for the Uddhav-Raj Thackeray alliance : मोदी – शाह – फडणवीस यांच्या जबड्यातून मुंबई वाचवायची असेल तर एकत्र यावं लागेल
Mumbai : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती करण्यासाठी नात्याची जोड देणार असल्याचे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. महिन्याभरापूर्वी या दोन भावंडांची युती होणार असल्याच्या चर्चा जोरावर होत्या. पण त्यानंतर चर्चा थंडावली. आता संजय राऊत यांनी उपरोक्त विधान करून पुन्हा या विषयाला हवा दिली आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं, हे महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या मनात आहे. मराठी माणसासाठी दोघांच्याही मनात आत्मीयता आहे. त्याचा भावनिक आणि राजकीय दबाव आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ईस्ट इंडिया कंपनी गुजरातच्या जबड्यातून मुंबई वाचवायची असेल, मराठी माणसाला मुंबईवर हक्क साबूत ठेवायचा असेल तर तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र यावं लागेल. भेदाभेद विसरून मुंबईसाठी आता पुढे यावं लागेल, ही उद्धव ठाकरे यांनी भूमिका असल्याचे संजय राऊत म्हणाले.
India – Pakistan : ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, काय म्हणाले परराष्ट्र मंत्री ?
उद्धव ठाकरेंशी माझी कालच चर्चा झाली. त्यांचं मन विशाल आहे. मराठी माणसाचं अहित होता कामा नये. लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एकत्र येण्याची वेळ आता आली आहे. असे केल्यास वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना ती मानंदना ठरेल. लवकरच उद्धव आणि राज ठाकरे यांची पडद्यामागची चर्चा पडद्यासमोर येईल. या पडद्याचे दोर दोन भावांच्याच हातात आहेत. हे दोघेच काय ते ठरवतील. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष फोडले. त्यांच्या लोकांना तुरूंगात टाकलं. पण ठाकरे – पवार ब्रॅंड संपला नाही आणि संपणारही नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.