Breaking

Mumbai Municipal Corporation : आम्ही मुंबईचे रस्ते साफ केले, तर काहींनी तिजोरी !

Eknadh Shinde’s Shiv Sena gives another blow to Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे यांची उबाठावर कडवी टीका, ठाकरेंना पुन्हा झटका

Mumbai : मुंबई महानगरपालिकेला काही जण स्वतःची जहागिरदारी समजत होते. त्यांच्या काळात त्यांनी मुंबई महापालिकेची तिजोरी साफ करण्याचे काम केले. महायुती सरकारने मुंबई स्वच्छ करण्याचे काम केले, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला. ब्रिटीशांच्या काळानंतर पहिल्यांदा मुंबईचे रस्ते धुतले गेल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबईचे माजी महापौर आणि उबाठाचे उपनेते दत्ता दळवी यांना शिवसेनेत घेऊन एकनाथ शिंदे यांनी उबाठाला पुन्हा एक मोठा झटका दिला. आतापर्यंत दळवी यांच्यासह ठाणे, रायगड, जळगाव जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी ४५ ते ५० नगरसेवक मूळ शिवसेनेत परतले आहेत. आता आलेल्या नगरसेवकांसह ही संख्या आता ७० वर गेली असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde : पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत शिंदेंचा थेट संवाद

काल (२८ एप्रिल) झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात धारावी, विक्रोळी, कांजूर, भांडूप, मुलुंडमधील महिला विभाग अध्यक्ष, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांच्यासह ५००हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. कालच्या पक्षप्रवेशाने उबाठाला मोठे खिंडार पडले आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे २००० कार्यकर्ते, सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा तालुक्यातील १८ सरपंच, छत्रपती संभाजी नगरमधून ओबीसी महासंघाचे २२ जिल्हाध्यक्ष असे मोठे पक्षप्रवेश झाले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde : निधड्या छातीने आतंकवाद्यांशी भीडला होता काश्मीरी सैय्यद !

महायुतीचे सरकार आल्यानंतर मुंबईतील रखडलेले सर्व प्रकल्प सुरू केले. मुंबईकरांना हक्काची घरे, आरोग्य सुविधा देण्याचे काम सरकार करत आहे. आम्ही दिलेला शब्द पाळतो, त्यामुळे कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. विधानसभेत ८० जागा लढून ६० जागा आम्ही जिंकलो. उबाठाला १०० जागा लढवून केवळ २० जागा जिंकता आल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा झेंडा फडकवणार आहोत, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.