Mumbai shook : चित्रपटात कामाचं आमिष दाखवून 17 चिमुकल्यांना डांबून ठेवलं !

Shocking incident, police make thrilling rescue : धक्कादायक प्रकार, पोलिसांनी केली थरारक सुटका

Mumbai : पवई परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘चित्रपटात काम देतो’ असं आमिष दाखवून 17 लहान मुलांना एका आरए स्टुडिओत डांबून ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. या घटनेने मुंबई हादरली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करून सर्व मुलांची सुखरूप सुटका केली आहे.

पवईतील आरए स्टुडिओमध्ये काही दिवसांपासून शूटिंग सुरू होतं. रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने “ऑडिशनसाठी या, मुलांना चित्रपटात काम मिळेल” असं सांगून वसई, वाशी, पनवेलसह विविध भागांतून मुलांना बोलावलं होतं. सर्व मुलांचे वय 15 वर्षांपेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे.

66शूटिंगच्या नावाखाली मुलांना सकाळी बोलावलं जायचं आणि रात्री उशिरापर्यंत स्टुडिओत ठेवण्यात येत होतं. ऑडिशनदरम्यान मुलांना जेवणासाठी बाहेरही जाऊ दिलं नाही, यामुळे पालकांना संशय आला. जेव्हा पालक स्टुडिओबाहेर आले, तेव्हा काचेमधून मुलं हात दाखवत होती, असा प्रत्यक्षदर्शीचा खुलासा आहे.

Satyacha morcha : मतचोरीविरोधात मनसे सह महाविकास आघाडीचा ‘सत्याचा मोर्चा’

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं, “स्टुडिओ पूर्णपणे बंद होता. आत काही दिसत नव्हतं. मुलं आत अडकलेली दिसत होती. आम्ही पोलिसांना कळवलं आणि लगेच कारवाई झाली. पण प्रश्न असा आहे. रोहित आर्याला एवढं धाडस कसं झालं?”

संकटाची माहिती मिळताच पवई पोलिसांनी स्टुडिओवर धाड टाकली आणि मुलांची सुटका केली. सध्या सर्व मुलं सुरक्षित आहेत आणि पालकांच्या ताब्यात आहेत. पोलीस आता रोहित आर्या आणि स्टुडिओ व्यवस्थापनाची चौकशी करत आहेत.

Doctor suicide case : कधी? आणि किती वेळा? पोलीसच भक्षक बनल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, स्टुडिओत गेल्या सहा दिवसांपासून शूटिंग सुरू होतं, आणि दररोज सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत मुलं आत असायची. मात्र, या शूटिंगचं परवानगीपत्र होतं का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

या प्रकरणात पोलिस तपास सुरू असला तरी रोहित आर्याने मुलांना डांबून का ठेवलं? आणि त्यामागचा उद्देश काय होता? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, पवईतील या घटनेमुळे मुंबईत सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.