In 2006, 209 people died, over 800 were injured ; 2006 मध्ये 209 जणांचा मृत्यू, 800 हून अधिक जखमी
Mumbai : देशाला हादरवून टाकणाऱ्या मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात आज निकाल समोर आला असून यात 11 आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे. या घटनेत 2006 मध्ये 209 निरपराध नागरिकांचा मृत्यू, तर 800 हून अधिक जखमी झाले होते. या निकालावर तज्ञांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुंबईकरांना न्याय हवा आहे या निकालाचा अभ्यास करून तपासात नेमक्या काय त्रुटी आहेत त्या शोधल्या जागा आणि या निकालाला आव्हान देण्यात यावे अशी मागणी समोर येत आहे.
मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्यानुसार मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील 11 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. उच्च न्यायालयाने या प्रकरणात सर्व 11 आरोपींना निर्दोष सोडल्याने तपास यंत्रणांना मोठा झटका बसला आहे. मुंबईतील लोकल ट्रेन्समध्ये 11 मिनिटांत सात ठिकाणी स्फोट झाले होते. चर्चगेट ते बोरिवली स्थानकांदरम्यान हे स्फोट झाले होते. या स्फोटांसाठी कुकर बॉम्बचा वापर करण्यात होता. मात्र, पोलीस आणि तपास यंत्रणांना याप्रकरणात न्यायालयात योग्यप्रकारे पुरावे सादर न करता आल्यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.