Mumbai Political Shift : सहर शेख यांचा उदय आणि आव्हाडांच्या ‘बालेकिल्ल्या’ला भगदाड!

Sahar Sheikh challenges Jitendra Awhad : ‘गुरु’ला आव्हान की मुस्लिम महिला नेतृत्वाचा उदय?

Mumbai महाराष्ट्रातील ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंब्रा भागातून AIMIM पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सहर शेख यांच्या विजयी भाषणाने एक नवीन राजकीय वादळ निर्माण केले आहे. २९ वर्षीय सहर शेख यांचे वडील युसुफ शेख हे राष्ट्रवादीचे (श.प. गट) नेते जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय होते. मात्र शब्द देऊनही आव्हाडांनी सहर यांना उमेदवारी दिली नाही. तेव्हापासून युसुफ आणि आव्हाड या दोन मित्रांमध्ये वैरभावना निर्माण झाली. निवडणुकीपूर्वी झालेल्या भाषणात युसुफ यांनी आव्हाडांवर जहरी आणि अतिशय खालच्या भाषेत टीका केली. त्यानंतर सहर शेख चांगल्या मतांनी निवडून आल्या. विजयी भाषणात त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून “कैसा हराया” म्हणत डिवचलं आणि सहर शेख हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचलं.

या भाषणात त्यांनी “सबंध मुंब्रा पूर्णपणे हिरवा करु” असं म्हटलं. यावरुन त्यांच्या प्रचंड टीका झाली. मात्र यावर स्पष्टीकरण देताना आमच्या पक्षाचा झेंडा हिरवा आहे, म्हणूनच मुंब्रा हिरवं करण्याचं वक्तव्य केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या वक्तव्यावर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे शिवसेना, भाजप आणि मनसे शांत आहेत. त्यांनी सहर शेखवर किंवा युसुफ शेखवर टिकास्त्र सोडलेले नाही. कदाचित त्यांचे राजकीय विरोधक जितेंद्र आव्हाड यांचा गड नेस्तनाबुत होत असताना ते बघ्याची भूमिका घेत आहेत. एकीकडे, आव्हाडांचं अस्तित्व धोक्यात सापडणे हे विरोधी पक्षांसाठी उत्तम आहे.

Eknath Shinde : मुंबईतही महायुतीचाच महापौर होणार

आव्हाड हे हिंदू विरोधी नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. इशरत जहां या अतिरेकीला शहीद म्हणत तिला सन्मान दिला होता. त्यांनी सतत हिंदू धर्मावर टीका केली आहे. हिंदुत्वाच्या राजकारणाला विरोध केला आहे. हिंदू कार्यकर्ते अनंत करमुसे यांना बंगल्यावर नेऊन मारहाण केल्याची घटनाही जुनी नाही. मात्र इतके सर्व करुनही हिंदुत्ववादी पक्षांना आव्हाडांविरोधात मोठे आव्हान उभे करता आले नव्हते. शरद पवारांचे शिष्य म्हणून राजकारणात त्यांचे वर्चस्व आहे. आता हे वर्चस्व कमी होत असताना किंवा धोक्यात सापडत असताना वर नमूद तिन्ही पक्षांनी न बोलण्याचे धोरण स्वीकारले आहे.

दुसरीकडे, सहर शेख यांच्या “हिरवा रंग” उल्लेखाला सांप्रदायिक अर्थ लावला गेला असल्याने, या पक्षांना त्यांचे समर्थन करणे शक्य नाही. शिवसेना, मनसे, भाजप यां पक्षांनी या प्रकरणावर फारसे बोलणे टाळले आहे. सरह शेख यांच्या कट्टर मुस्लिम इमेजमुळे त्यांची बाजूही घेता येत नाही आणि समान शत्रू आव्हाडांना परास्त करण्यासाठी शेख यांच्यावर टीकाही करता येत नाही. एकेकाळी सहर शेख आव्हाडांना आपला गुरु मानत होत्या, पण आता त्या त्यांच्याविरोधात उभ्या राहिल्या. दुसरीकडे, हिंदुत्ववादी पक्षांना सहर शेख यांनाही नियंत्रित करावे लागणार आहे.

Harshvardhan Sapkal : फडणवीस सर्वात निष्क्रीय, अकार्यक्षम व बेजबाबदार मुख्यमंत्री

कारण एमआयएम चं वाढतं प्रस्थ भाजपा प्रभृती पक्षांसाठी धोकादायक ठरु शकतं. तसेच या घटनेने आव्हाडांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आव्हाड हे मुंब्रा-कालवा मतदारसंघाचे चार वेळा आमदार आहेत आणि मुस्लिम बहुल भागात ते प्रसिद्ध आहेत. सहर शेख यांच्या वडिलांचा, युनुस शेख यांचा, आव्हाडांशी जुना संबंध आहे. युनुस शेख एकेकाळी आव्हाडांचे निकटवर्तीय होते, पण राजकीय मतभेदांमुळे संबंध बिघडले. आता आव्हाडांना पुढील आमदारकीच्या निवडाणुकीत शेख कुटुंबाच्या आणि मुस्लिम समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

आव्हाडांपेक्षा शेख मुस्लिमांना जवळचे वाटू शकतात. कदाचित आमदारकीला स्वतः युसुफ शेख आव्हाडांच्या विरोधात उभे राहू शकतात. इतर गैर-मुस्लिम पक्ष या संधीचा लाभ घेत हिंदुंना आकर्षित करु शकतात आणि द्वंद्वात जितेंद्र आव्हाडांचा पराभव होऊ शकतो. त्यामुळे सहर शेख किंवा शेख कुटुंबाचा राजकीय उदय सर्वच विरोधकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

Chandrashekhar Bawankule : नागपूरचा महापौर भाजप ठरवेल, वडेट्टीवार नव्हे!

सहर शेख या तरुण नगरसेविका आहेत. त्यांची कारकीर्द आता सुरु झाली आहे. मात्र ही कारकीर्द केवळ आव्हाडांना विरोध म्हणून सुरु झाली असेल तर राजकारणासाठी हे योग्य ठरणार नाही. कारण मुस्लिम मभिलांचं राजकारणातलं स्थान अत्यंत नगण्य आहे. मुस्लिम समाजात महिलांवर अनेक बंधने आहेत. या पार्श्वभूमीवर सहर शेख यांचा उदय बोलका आहे.

त्यांच्या बुद्धिची चुणुकही जाणवली आहे. कारण हिरव्या रंगावरुन त्यांनी ज्याप्रकारे कोलांट उडी घेतली, त्यावरुन त्यांना रक्तात राजकारण असल्याचं जाणवतं. त्यांचं भाषण आक्रमक शैलीचं आहे. मुंब्र्यातील स्थानिक जनतेला भुरळ पाडणारं व्यक्तिमत्त्व आणि भाषा शैली त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रवास केवळ या निवडणुकीपुरता राहू नये किंवा केवळ सह्याजीराव बनून त्यांची राजकीय कारकीर्द जाऊ नये. त्यांनी मुस्लिम महिलांसाठी आदर्श निर्माण करायला हवा. त्यांचे पक्ष प्रमुख ओवैसी हे वकील आहेत.

ते सुधारणावादी मुस्लिम असल्याचे भासवतात. तर हा सुधारणावाद केवळ शब्दांपुरता मर्यादित न राहता सहर सेख यांच्या अनुषंगाने तो महाराष्ट्रभर पसरायला हवा आणि मुस्लिम महिलांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी, राजकीय पटलावर आणण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. मात्र सांप्रदायिक भाषेपासून त्यांनी दूर राहायला हवं. सहर शेख यांना पाहून भविष्यात, मुस्लिम महिला राजकारणात अधिक सक्रिय होतील, पण त्यांचे भवितव्य पुरुषी सत्तेने नको ठरवायला.