Muncipal Council : नगर परिषदेचा कारभार ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’

The financial condition of Sindkhed Raja municipality is critical : सिंदखेडराजा नगर परिषदेची आर्थिक स्थिती बिकट

Sindkhedraja राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान म्हणून ऐतिहासिक ओळख असलेल्या सिंदखेडराजा नगर परिषदेची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. गेल्या चार दशकांपासून अस्तित्वात असलेली ही परिषद आज ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ या परिस्थितीत सापडली आहे.

सदर परिषदेची मासिक वसुली केवळ ३ ते ४ लाख रुपयांच्या घरात असताना, मासिक खर्च तब्बल २२ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे अनेक कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले वर्षानुवर्षे थकीत राहिली आहेत. शहराच्या विकासासाठी लागणाऱ्या निधीअभावी नागरिकांना मूलभूत सुविधांमध्ये अडचणी निर्माण होत असून, राजकीय व सामाजिक वर्तुळातून नगर परिषदेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Maratha reservation : ड्राफ्ट आधीच माहीत होता, अजेंड्यानुसार समाज वेगळा पाडला

पाणीपुरवठ्यासाठी खडकपूर्णा प्रकल्पावर दरमहा ८ ते १० लाख रुपये खर्च होतो. दिवाबत्तीचे २ ते ३ लाख, शहर स्वच्छतेवर ६ लाख, पाणीपुरवठा कर्मचारी व उद्यान देखभाल आदीसाठी ३ ते ४ लाख रुपये खर्च होतात. विविध कार्यक्रमांमुळे स्वच्छता आणि सार्वजनिक सोयीसुविधांवर खर्च करणे नगर परिषदेच्या दृष्टीने अनिवार्य असले तरी उत्पन्नाच्या मर्यादांमुळे हा भार अधिकच वाढला आहे.

Dashara melava : दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची चर्चा

राजकीय नेत्यांकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी नगर परिषदेच्या उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे. स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे करवसुलीही अत्यंत कमी आहे.

स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा आहेत की, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून नगर परिषदेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे किंवा विकासासाठी वेगळे निधी उपलब्ध करून द्यावेत. अन्यथा सिंदखेडराजा नगर परिषदेची ओळख फक्त कर्जबाजारी संस्थेपुरती मर्यादित राहील, अशी टीका विरोधकांकडून होत आहे.