Manoj Jarange’s shocking allegation, appeal for peace : मनोज जरांगे यांचा थरारक आरोप, शांततेचे आवाहन
Jalna : मराठा समाजाचे नेते आणि आरक्षण चळवळीचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जालना पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आज मनोज जरांगे पाटील यांनी थेट प्रतिक्रिया देत गंभीर आरोप केले. “माझ्या हत्येचा कट बीड जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याने रचला आहे,” असं म्हणत त्यांनी थेट राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “फक्त मराठ्यांनी शांत राहा. तुम्ही माझं ऐकता, मी तुमचं ऐकतो, असा समाज होणार नाही. माझी माणसं शांत राहिली पाहिजेत. सगळ्यांनी शांत राहा. मी सावध आणि सर्तक आहे, नसतो तर याचा बाप ठरलो नसतो. सुखाचे दिवस येणार आहेत.”
“पुण्यात Another land scam : आणखी एक जमीन घोटाळा! कृषी विभागाची ५ एकर जमीन हडप !
जरांगे म्हणाले, “कालच्या घटनेबद्दल माझ्या गोरगरीब समाजापर्यंत हा खरा संदेश देणं मला गरजेचं वाटलं. मराठा समाजाने शांत राहावं, असं मी हात जोडून सांगतो. तुम्ही साधी कामं करा, अवघड काम मी करायला आहे. मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. मी जे सांगणार आहे ते सगळ्या क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचं आहे. यातून सगळेच जागे होणार आहेत. ज्यांनी माझ्याविरोधात कट रचला, त्यांचे सारे डावे आधीच उघड झाले आहेत. माझे हात लांब आहेत, हे त्यांना आता समजलं आहे.”
आपल्या समाजाला धीर देताना जरांगे म्हणाले, “मराठा समाजाला मी एक शब्द देतो सावध आणि सर्तक राहा. मी जिवंत आहे तोपर्यंत कुणी टेन्शन घ्यायचं नाही. मी मेल्यावर काय करायचं ते ठरवा. पण तोपर्यंत शांत राहा. कारण आधीच त्यांच्या सगळ्या योजना उघड झाल्या आहेत. आरक्षण मिळालं ते आपण सर्तक होतो म्हणूनच. मी माझ्या समाजासाठी खंबीरपणे लढणार आहे.”
जरांगे यांनी पुढे स्पष्ट संदेश दिला “तुम्ही शांत राहा, मी तुम्हाला हसायला लावीन. सुखाचे दिवस येत आहेत. साडेसाती संपली आहे गावाची, जिल्ह्याची आणि राज्याची. तुम्ही शांत राहिलात तर मी सुखाचे दिवस आणून दाखवीन. राज्यातील सर्व मराठा नेत्यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा. मराठा संघटना आणि स्वयंसेवकांनीही हे गंभीरतेने घेतलं पाहिजे. आज माझ्यावर वेळ आली म्हणून तुम्ही मजा घेऊ नका; उद्या वेळ तुमच्यावरही येऊ शकते. मतभेद असले तरी एकजीवाने काम करणं गरजेचं आहे.”
Local Body Elections : आमदार प्रवीण दटकेंसमोर नागपूर जिल्हा काबीज करण्याचे आव्हान !
मनोज जरांगे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंवर थेट आरोप करताना म्हटलं की, “छत्रपती संभाजीनगरजवळ एका ठिकाणी आरोपींची आणि मुंडे यांची भेट झाली. तिथे मुंडे यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी त्यांना गोळ्या देण्याचं सांगितलं. हे मुंडे यांचे नपुंसक चाळे आहेत. हिंमत असेल तर थेट येऊन भिडा.”
यापूर्वीही लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जरांगे यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करण्यात आला होता. पण आता थेट एका मंत्र्यावर आरोप झाल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या जरांगे पाटलांवर झालेल्या या संभाव्य कटामुळे सुरक्षा यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे.
Pune land scam: १ टक्के शेअरधारकावर गुन्हा, मग पार्थ पवारांवर का नाही?
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मराठा समाजाला शांत, सजग आणि एकजूट राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, “मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाला काही होऊ देणार नाही. सुखाचे दिवस लांब नाहीत ते येतच आहेत.”








