Municipal Corporation Elections : महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची जम्बो कार्यकारिणी !

Ajit Pawar’s NCP Announces a Jumbo Executive Committee : अनुभवी आणि उत्साही कार्यकर्त्यांचा केला समावेश

Nagpur : नागपूर महानगर पालिकेची निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर होणार आहे. असे असले तरी राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी आत्तापासूनच जोरबैठका लावणे सुरू केले आहे. भारतीय जनता पक्ष निवडणुकीची तयारी करत नाही, तर नेहमीच निवडणुकांसाठी तयार राहणारा पक्ष आहे. इतर पक्ष मात्र आता तयारीला लागले आहेत. स्थापनेपासूनच विदर्भात फारशी ताकद नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता विदर्भाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. अजित पवार गटाने महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन काही बदल केले आहेत.

अजित पवार गटाची जेव्हा स्थापना झाली, तेव्हा धडाकेबाज नेते प्रशांत पवार यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मध्यंतरी अजित पवार आणि प्रफुल पटेल यांनी नागपुरात येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ही पक्षाची कार्पोरेट मिटींग होती. यानंतर प्रशांत पवार यांना हटवून जुनेजाणते अनुभवी नेते अनिल अहीरकर यांच्याकडे शहराध्यक्षपद देण्यात आले. या बदलामध्ये शहराचे कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर आणि युवा अध्यक्ष विशाल खांडेकर हे मात्र कायम राहिले. प्रशांत पवार यांच्यासोबत ज्या धडाक्यात त्यांनी काम केले, आताही त्यांचा तोच धडाका कायम आहे. नवे शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या नेतृत्वात जम्बो कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. या बळावर महापालिका निवडणुकीत यश मिळेल, असा विश्वास पक्षाला आहे.

Sanjay Gaikwad : निवडणूक आयाेगाचा मनमानी कारभार, कुणाचेही नियंत्रण नाही

अनिल अहीरकर आणि श्रीकांत शिवरकर यांच्या नेतृत्वात नवी कार्यकारीणी घोषीत करण्यात आली. यामध्ये शहर कोषाध्यक्ष विरेंद्र यादुका, पूर्व नागपूर अध्यक्ष ब्रम्हानंद मस्के, पश्चिम नागपूर राजपाल सिंग चौहाण, उत्तर नागपूर दिनेश रोडगे, दक्षिण नागपूर मुकेश रेवतकर, दक्षिण पश्चिमचे अध्यक्ष संदीप सावरकर आणि मध्य नागपूर अध्यक्ष किरण नंदनवार यांचा समावेश आहे. शहर उपाध्यक्षपदावर राकेश घोसेकर, मोंटी गंडेचा, राजू मिश्रा, राजेश शुक्ला, संतोष भुजाडे यांचा समावेश करण्यात आला आहे.

Election commission of India : ही तर कमालच झाली! मतदार याद्यांमधून गावेच गायब

शहर महासचिव हरविंदर सिंग मुल्ला, प्रवीण पाटील, राजेश समर्थ, नानाजी जांभुळकर, भारत मुधळे, सुशांत पाली, राजेंद्र भोयर, रीतेश लक्केवार, संजय तिवारी, विनय सावलकर, शहर सचिव लक्ष्मीकांत पांडे, सुशांत पाली, ऋषी बोरोटे, महेंद्र देशपांडे, प्रभूदास तायवडे, संजय पाटील, संजय जोशी, निखिल चाफेकर, उमाजी कोहळे, संघटन सचिव अमित भोंगाडे, भरत शर्मा, अविनाश पार्डीकर सुरेंद्र दुधनकर यांना नियुक्त करण्यात आले आहे. यावेळी नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, प्रशांत पवार, आभा पांडे, बजरंग सिंग परिहार, तानाजी वनवे, सुनीता येरणे, रमण ठवकर, दिलीप पनकूले, आनंद सिंग, राजेश माटे, जानबा मस्के, विश्वजीत तिवारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.