Municipal Corporation Elections : सत्ता स्थापनेसाठी राजकीय डावपेच, भाजपच्या गळाला कोण लागणार?

All eyes are on the mayoral reservation : राजकारण निर्णायक टप्प्यावर, महापौरपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष

Akola अकोला महापालिकेच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळू लागले असून, भारतीय जनता पक्षाकडून सत्ता स्थापनेसाठी डावपेच आखले जात आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या गळाला कोण लागणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले, तरी भाजप सर्वाधिक जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळाचे गणित जुळविण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकद लावली आहे.

भाजपाकडून अपक्ष नगरसेवक तसेच विविध पक्षांतील नाराज घटकांशी सातत्याने संपर्क साधला जात असून, शहराला ‘विश्वासार्ह आणि स्थिर सत्ता’ देण्याचा दावा केला जात आहे. महापालिकेतील विकासकामांना गती देण्यासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक असल्याचे सांगत भाजपाकडून राजकीय खेळी आखली जात असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत भाजपाकडून सत्तास्थापनेचा अधिकृत दावा सादर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Akola municipal corporation Result 2026 : अकोल्यात शिंदेंच्या ‘फौजे’वर उद्धवसेनेची मात; अकोला पूर्वमध्ये ‘मशाल’ पेटली!

महापालिकेतील सत्तास्थापनेचे राजकारण आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले असून, येत्या काही दिवसांत घडणाऱ्या घडामोडींमुळे शहराच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला जाणार असल्याचे संकेत आहेत. महापौरपदाचे आरक्षण आणि संख्याबळाचे गणित या दोन प्रमुख घटकांवरच सत्तेची चावी कुणाच्या हाती जाणार, हे ठरणार आहे.
दुसरीकडे, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विविध पक्ष, अपक्ष नगरसेवक आणि आघाड्यांमध्ये हालचाली सुरू असल्या, तरी त्यांच्यातील अंतर्गत मतभेद, नेतृत्वाचा प्रश्न आणि महापौरपदाच्या दाव्यावरून एकवाक्यता नसल्याचे चित्र दिसून येत आहे. याचाच फायदा भाजप उचलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

Sandip Joshi Devendra Fadnavis : कुणी कमी केली संदीप जोशींची ‘किंमत’?, मुख्यमंत्र्यांवर थेट नाराजी

या सत्तासंघर्षात महापौरपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौरपद कोणत्या वर्गासाठी आरक्षित राहणार, याचा निर्णय जाहीर होताच संपूर्ण राजकीय समीकरणे बदलू शकतात. आरक्षणाचा फायदा किंवा फटका कोणाला बसणार, यावरच पुढील रणनीती ठरणार असल्याने सर्वच पक्ष ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेत असल्याचे दिसून येते.

महापौरपदावर आपलाच दावा मजबूत करण्यासाठी भाजपाकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असून, पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. “आवश्यक संख्याबळ आमच्याकडे आहे, फक्त योग्य क्षणाची प्रतीक्षा आहे,” असा आत्मविश्वास भाजप नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. जर भाजपाने अपेक्षित संख्याबळ जमवले, तर अकोला महापालिकेच्या राजकारणात खरोखरच मोठा ‘राजकीय भूकंप’ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.