chhatrapati-sambhajinagar-municipal-corporation-town-planning-revenue-growth-2026 : १३२२ बांधकाम प्रस्तावांना मंजुरी; विकासकामांसाठी तिजोरी बळकट
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने चालू आर्थिक वर्षात महसूल संकलनाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या १० महिन्यांच्या कालावधीत विभागाने तब्बल ९८ कोटी रुपयांचा महसूल तिजोरीत जमा केला आहे. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे बांधकाम परवानग्यांच्या मागणीत झालेली वाढ आणि प्रशासनाने राबवलेली पारदर्शक ऑनलाईन प्रक्रिया यामुळे हे यश मिळाल्याचे मानले जात आहे.
नगररचना विभागाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांची संख्या आणि मंजूर परवानग्यांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. एकूण प्राप्त: १८०० हून अधिक प्रस्ताव प्राप्त झाले. १३२२ मंजूर बांधकामांना परवानग्या देण्यात आल्या. निवासी, व्यावसायिक आणि मिश्र वापराच्या इमारतींचे बांधकाम शुल्क, नकाशा तपासणी शुल्क आणि विकास शुल्क याचा समावेश आहे.
Raj Thackeray : मराठी अस्मिता हा आजार नव्हे, तर बाणा, सरसंघचालकांच्या विधानावर राज ठाकरे संतप्त
महानगरपालिकेने बांधकाम परवानगीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. ‘रेडीया’ (BPAMS) प्रणाली आणि ऑनलाईन अर्जामुळे नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत. उपअभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली भूखंडाची तांत्रिक तपासणी, जमिनीच्या दस्तऐवजांची पडताळणी आणि ‘विकास नियंत्रण नियमावली’ (DCR) नुसार नकाशांची छाननी केली जाते. केवळ परवानगी देऊन प्रशासन थांबत नाही, तर बांधकाम पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष स्थळनिरीक्षण करून ‘भोगवटा प्रमाणपत्र’ (Occupancy Certificate) मिळेपर्यंत देखरेख ठेवली जाते.
https://sattavedh.com/chandrapur-municipal-corporationsudhir-mungantiwar-success-chandrapur-municipal-corporation-mayor-election-bjp-victor
मिळालेला ९८ कोटींचा महसूल शहराच्या मूलभूत सोयीसुविधांवर खर्च केला जाणार असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि उन्नतीकरण करणे. पाणीपुरवठा योजनांचे सक्षमीकरण आणि ड्रेनेज लाईनचे जाळे विस्तारणे तसेच उद्याने, आरोग्य केंद्रे आणि सामाजिक सुविधांच्या विकासासाठी या निधीचा मोठा आधार मिळणार आहे.








