Municipal Council election : खामगाव–जळगाव जामोद–शेगाव मिळून ८ उमेदवार बाद

The District Court disqualified eight candidates : मोठा राजकीय धक्का, जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाने राजकीय खळबळ

Khamgao नगरपालिका निवडणुकीचा प्रचार जोमात असतानाच खामगाव, जळगाव जामोद आणि शेगाव या तीन नगरपालिकांतील ८ उमेदवारांना जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणूक रिंगणातून बाहेर व्हावे लागले आहे. नूतनीकरण न झालेल्या नोटरीकडून झालेले शपथपत्र, सही नसलेली प्रतिज्ञापत्रे आणि दस्तऐवजांतील त्रुटी ही प्रमुख कारणे ठरली आहेत. या धक्कादायक निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बाद झालेल्या उमेदवारांमध्ये — भाजपचे ३ उमेदवार, काँग्रेसचे २, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)चे २ तर एमआयएमच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. खामगाव प्रभाग ७ (अ) मधील भाजपाची अधिकृत उमेदवार मीरा गोपीचंद लोंढे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. अपक्ष उमेदवार शितलप्रीतम माळवंदे यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर सही नसल्याचा आक्षेप घेत न्यायालयात अपील केले होते. सुनावणीनंतर न्यायालयाने हा आक्षेप ग्राह्य धरत लोंढे यांची उमेदवारी रद्द केली.

Devendra Fadnavis : भाजपमध्ये भ्रष्टाचाराला जागा नाही, मुख्यमंत्र्यांचा दावा

प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)च्या सौ. शितल देवेंद्र देशमुख यांचाही अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यांच्या शपथपत्रासाठी वापरण्यात आलेली नोटरी मुदत संपलेली असल्याचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार सौ. गायत्री थानवी यांनी आव्हान दिले होते. तसेच खामगावातील इतर प्रभागांमध्येही दस्तऐवजांतील त्रुटींमुळे काही अर्ज रद्द ठरवण्यात आले.

जळगाव जामोद : भाजपचे दोन, एमआयएमचा एक अर्ज रद्द
जळगाव जामोद नगरपालिकेतील —
प्रभाग ६ : भाजपा उमेदवार अनिल चंद्रकांत जयस्वाल, तसेच एमआयएम उमेदवार शाहीन परवीन अफसर खान
प्रभाग ७ : भाजपाची दुसरी महिला उमेदवार यांचे अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने २५ नोव्हेंबर रोजी रद्द घोषित केले.

Local Body Elections : चिखलीत काँग्रेस–वंचित युती कोसळली!

शेगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक १६ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)च्या सौ. वर्षा अशोक जसवानी यांच्या अर्जासोबतही नूतनीकरण न झालेल्या नोटरीचे शपथपत्र जोडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने त्यांचा अर्ज छाननीत नामंजूर केला होता.
जसवानी यांनी हा निर्णय न्यायालयात आव्हान दिले; परंतु अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्याचा निर्णय योग्य ठरवत अर्ज नामंजूरच ठेवल्याची घोषणा केली.

निवडणुकीच्या काहीच दिवसांपूर्वी उमेदवार बाद झाल्याने तिन्ही नगरपालिकांमध्ये नवे राजकीय गणित निर्माण झाले आहे. काही प्रभागांत उमेदवारी रिक्त झाल्याने पक्षांतर्गत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.