Municipal Election : अकोल्यात बुरखाधारी महिलांची ओळख न पटवता थेट मतदान केंद्रात प्रवेश

Collapse of secret system raises serious questions about Election Commission : पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

Akola: मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असून सकाळच्या टप्प्यात मतदानाचा प्रतिसाद तुलनेने कमी दिसून आला. मात्र, दुपारकडे नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. सकाळी 11.30 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली असून राज्याचे लक्ष लागलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत 17.58 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, राज्यातील विविध मतदान केंद्रांवरून तक्रारी येत असून कुठे दुबार मतदानाचे आरोप, कुठे मतदानानंतर बोटावरील शाई पुसून बोगस मतदानाचा प्रयत्न होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.

राज्यातील मुस्लिमबहुल आणि काही संवेदनशील मतदान केंद्रांवर बुरखाधारी महिला मतदारांची ओळख पटवण्यासाठी निवडणूक विभागाने ‘पडदाशीन’ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पडदा आणि बुरखा घातलेल्या महिला मतदारांची स्वतंत्रपणे ओळख पटवून दुबार किंवा बोगस मतदान टाळणे, हा या व्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे. मात्र, अकोल्यात ही व्यवस्था प्रत्यक्षात पूर्णपणे फेल ठरत असल्याचे दिसून आले आहे.

Municipal Election : मतदारांनो सावधान, शाई पुसल्यास तुमच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो !

अकोला शहरातील भांडपुरा भागातील प्रभाग क्रमांक 17 मधील सर्वच मतदान केंद्रांवर बुरखाधारी महिला मतदारांना कोणतीही ओळख न पटवता थेट मतदान केंद्राच्या आत सोडले जात असल्याचे चित्र आहे. पडदाशीन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती असतानाही ओळख तपासणी न करता मतदारांना आत प्रवेश दिला जात असल्यामुळे निवडणूक आयोगाने मोठ्या गाजावाजात उभी केलेली ही व्यवस्था कागदावरच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे दुबार आणि बोगस मतदानाचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आज सकाळपासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. राज्यात एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही महापालिका निवडणूक होत असून 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. यासाठी राज्यभरात 39 हजार 92 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. या निवडणुकीत एकूण 15 हजार 908 उमेदवार रिंगणात आहेत.

Thane municipal corporation election: लंडन से आया मेरा व्होटर, व्होटर को सलाम करो

सकाळी 11.30 वाजेपर्यंत विविध महापालिकांमधील मतदानाची टक्केवारी समोर आली असून बृहन्मुंबई महानगरपालिकेत 17.58 टक्के, पुण्यात 10.50 टक्के, नवी मुंबईत 15 टक्के, कोल्हापूरमध्ये 22.45 टक्के, इचलकरंजीत 18.57 टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये 16.03 टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 ते 17 टक्के, नाशिकमध्ये 14.31 टक्के, सांगली-मिरज-कुपवाडमध्ये 17.20 टक्के, सोलापूरमध्ये 18.08 टक्के, अहिल्यानगरमध्ये 20.16 टक्के, जळगाव शहरात 13.39 टक्के, धुळ्यात 14.23 टक्के, नागपुरात 12 टक्के, पनवेलमध्ये 17 टक्के, मालेगावमध्ये 20.92 टक्के, जालन्यात 20.13 टक्के आणि अमरावतीत 17.02 टक्के मतदान नोंदवले गेले आहे.

दरम्यान, बोटावर लावलेली शाई पुसून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा किंवा पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न करणे हे गंभीर गैरकृत्य असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदानासाठी आल्याचे आढळल्यास तिच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही निवडणूक आयोगाने दिला आहे. अकोल्यातील पडदाशीन यंत्रणेच्या अपयशामुळे निवडणूक व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

___