DCM Eknath Shinde big operation… : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं ऑपरेशन…
Nashik : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचाराचा जोर वाढला आहे. प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त महापालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही रोज वेगवेगळ्या शहरांमध्ये सभा घेत असून संघटन मजबूत करण्यावर भर देत आहेत. अशातच नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून एकनाथ शिंदे यांनी मोठं ऑपरेशन करत दोन माजी महापौरांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. या घडामोडीमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ऐन निवडणुकीच्या काळात घडलेल्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढली असून इतर पक्षांसाठी ही बाब चिंतेची ठरत आहे. माजी महापौर अशोक मुर्तडक आणि माजी महापौर दशरथ पाटील यांनी आज अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांचे शिवसेनेत स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Municipal elections : उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार
अशोक मुर्तडक हे मनसेची सत्ता असताना नाशिकचे महापौर होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर दशरथ पाटील हे शिवसेना फुटण्यापूर्वी शिवसेनेकडून महापौर होते आणि काही काळापूर्वी त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघेही भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा होती.
अशोक मुर्तडक यांनी भाजपकडे प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. उमेदवारी डावलल्याने नाराज झालेल्या मुर्तडक यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तर माजी महापौर दशरथ पाटील यांचा मुलगा प्रेम पाटील हे आधीपासूनच शिवसेनेत सक्रिय आहेत. शिवसेनेने प्रेम पाटील यांना प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी दिली आहे. मुलगा शिवसेनेत असल्यामुळे दशरथ पाटील हेही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती, आणि आज ती प्रत्यक्षात आली.
Municipal elections : प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र?
या दोन्ही माजी महापौरांच्या शिवसेना प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिंदे गटाची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घडामोडीमुळे नाशिकच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होत असून पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या हालचाली पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
___








