Municipal elections : मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव

Tejal Pawar makes serious allegations against Assembly Speaker Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर तेजल पवार यांचे गंभीर आरोप

Mumbai: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या तेजल पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला, असा आरोप तेजल पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला. काही दिवसांपूर्वी हरिभाऊ राठोड यांनीही राहुल नार्वेकर यांच्यावर धमकावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता तेजल पवार यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तेजल पवार यांच्या पतीने पत्रकार परिषदेत संपूर्ण घटनाक्रम सांगताना आरोप अधिक गंभीर असल्याचे चित्र मांडले. तेजल पवार समाजसेवेची ओढ असलेली असून त्या टाटा हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होत्या आणि लोकसेवा करण्याच्या उद्देशाने त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी तू माझ्या विरोधात फॉर्म कसा भरलास, कोणीतरी तुला शिकवलं असणार, असे म्हणत दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला.

तेजल पवार यांच्या पतीच्या म्हणण्यानुसार, “16 तारखेनंतर 17 तारीख येते, मी काहीच बोललो नाही, इतक्या लोकांसमोर काय बोलू, असं म्हणत ते निघून गेले.” त्यानंतर राहुल नार्वेकर यांचे पीए वारंवार फोन करू लागले, मात्र मुलाची तब्येत बरी नसल्याने फोन न उचलता हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, असे त्यांनी सांगितले.

Municipal elections : काँग्रेस आणि एमआयएमसोबतची युती खपवून घेतली जाणार नाही !

31 तारखेला सकाळपासून पीएचे फोन येत राहिले. 226 क्रमांकाच्या प्रभागातून पाच उमेदवार होते, त्यापैकी दोन अपात्र ठरले आणि तीन पात्र ठरले. त्यामध्ये तेजल पवार, मकरंद नार्वेकर आणि एक अपक्ष उमेदवार होते. त्या अपक्ष उमेदवाराला फॉर्म भरण्यासाठी मदत केली होती आणि त्याला विजयाच्या शुभेच्छा देऊन बाहेर पडलो, असे त्यांनी सांगितले.

यानंतर राहुल नार्वेकर यांचे पीए पुन्हा भेटले. बोलता-बोलता रिचर्ड क्रूड मिलच्या बाहेर आलो. राहुल नार्वेकर यांना भेटण्यास सांगितले. मी तीन-चार दिवस झोपलो नाही, नंतर भेटतो असे सांगितले. मात्र जबरदस्तीने ‘चल, चल’ म्हणत खांद्यावर हात ठेवण्यात आला. माझ्यासोबत पत्नी असताना तुम्ही काय करताय, असे विचारल्यावर ‘आम्ही कुलाब्याचे आहोत’ असे सांगण्यात आले. मी गाडीत बसणार नाही, माझ्याकडे बाईक आहे असे सांगितले तरी बॉडीगार्ड खाली उतरले आणि मला घेराव घातला, असा गंभीर आरोप तेजल पवार यांच्या पतीने केला.

Municipal elections : भाजपच्या चुकीमुळे नाहक त्रास नको, लोकशाही मार्गानेच उत्तर देऊ !

यानंतर गाडीत बसल्यानंतर सुरुवातीला प्रेमळपणे बोलण्यात आले. तुला काय पाहिजे, हवं ते कॉन्ट्रॅक्ट घे, आधी उमेदवारी माघार घे, असे सांगण्यात आले. मला तो अपक्ष उमेदवार माघार घेणार आहे हे तेव्हा माहित नव्हते. गाडीत ‘मी तुझी लाईफ सेट करतो’ असे शब्द वापरले गेले, असा आरोपही त्यांनी केला.

या आरोपांमुळे विधानसभा अध्यक्षासारख्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणावर राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया काय येते आणि या आरोपांची चौकशी होते का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

__