Re-election demand in eight constituencies in Vidarbha : दिड महिना झोपले, आता म्हणतात अन्याय झाला!
Nagpur राज्यात विधानसभा निवडणूक झाली. निकाल लागला, मुख्यमंत्री-मंत्री ठरले. नव्या सरकारचे पहिले अधिवेशन झाले. आता सरकार कामाला लागले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सर्व पक्षांचं लक्ष लागलं. पण या संपूर्ण घडामोडीत महाविकास आघाडीला अचानक जाग आली आणि आपल्यावर अन्याय झाल्याचा ‘साक्षात्कार’ झाला. दिड महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनियमितता झाल्याचा दावा आघाडीच्या नेत्यांनी न्यायालयात केला. महाविकास आघाडीचं कोंबडं उशिरा आरवल्याने हा निव्वळ गमतीचा विषय होऊन बसला आहे.
खरं तर एखाद्या पक्षाने किंवा आघाडीने न्यायालयात दाद मागणे हा खूप मोठा विषय आहे. पण महाविकास आघाडीने निवडणूक गैर होती, असं आत्ता म्हटल्यामुळे ‘बोलो इतने दिन क्या किया?’ असाच प्रश्न उपस्थित होत आहे. मध्य नागपूर मतदारसंघात भाजपचे प्रवीण दटके यांच्या विरोधात काँग्रेसचे बंटी शेळके रिंगणात होते. त्यांनी जंग पछाडली. खूप प्रयत्न केले. पण पराभूत झाले. त्यांनी पराभव मान्य केला आणि दटकेंच्या अभिनंदनासाठी धावत गेले.
Wardha Police : ठाणेदारांच्या मध्यस्थीने उघडले देवस्थान कार्यालयाचे कुलूप
निवडणूक झाली, निकाल लागले, सरकारचा कारभार सुरू झाला. आता आपण जरा विश्रांती घ्यावी. कुटुंबाला वेळ द्यावा, असा विचार बंटी शेळकेंनी केला आणि ते कुटुंबासह काश्मीरला रवाना झाले. शेळकेंनी त्यांचा थर्टी फर्स्ट Thirty First काश्मीरमध्ये साजरा केला. महाविकास आघाडीच्या ज्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरांच्या विजयाला आव्हान दिले आहे, ते एवढे दिवस काय करत होते, हा प्रश्न उपस्थित होतो.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांनी निवडणुकीत घोळ झाल्याची शंका व्यक्त केली होती. पण त्याचवेळी कुणी न्यायालयाचे दार ठोठावले असते तर त्याची सर्वसामान्य जनतेनेही दखल घेतली असती. मात्र आता निकालाला दीड महिना उलटल्यानंतर Mahavikas Aghadi च्या आठ पराभूत उमेदवारांना जाग आली आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे दार ठोठावले आहे. या पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्यासह आठ विजयी उमेदवारांविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केल्या.
आम्ही जागे आहोत
न्यायालयाचे दार ठोठावणाऱ्या नेत्यांना काय सिद्ध करायचे आहे? तर आम्ही झोपी गेलेलो नाही, आम्ही जागे आहोत, असं सांगायचं आहे. त्यासाठी त्यांनी थेट निवडणूक रद्द करण्यात यावी, अशीच मागणी न्यायालयाकडे केली आहे. अतिशय धक्कादायक लागला आहे. त्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. या निवडणुकीत अनियमितता झाली आहे, असे याचिकेत म्हटले आहे. या एकूणच परिस्थितीवर महाविकास आघाडी को ये हुआ क्या है? असाच प्रश्न विचारला जात आहे.