Thackeray groups big decision on the day of India – Pak match : भारत-पाक सामन्याच्या दिवशी ठाकरे गटाचा मोठा निर्णय
Mumbai : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी अजूनही ताज्या असतानाच 14 सप्टेंबर रोजी आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. या सामन्यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून, सामन्याच्या दिवशीच पक्षाने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून ‘माझं कुंकू-माझा देश’ आंदोलन राबवले जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासोबतच त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अजूनही 26 निरपराध लोक पहलगाम येथे मारले गेले. त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश संपलेला नाही. ऑपरेशन सिंदूर सुरु असल्याचं सांगताय, पाकिस्तानचे कंबरडे मोडू म्हणताय. खून आणि पाणी एकत्र वाहणार नाही, असं म्हणताय. मग खून आणि क्रिकेट एकत्र कसं चालणार? यावर भाजप, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी भूमिका स्पष्ट करावी.”
NCP Sharad Pawar : रस्त्यावर उतरा, लोकांपर्यंत जा, त्यांना न्याय मिळवून द्या
राऊत यांनी स्पष्ट केले की, 14 सप्टेंबरला शिवसेनेची महिला आघाडी रस्त्यावर उतरणार आहे. “माझं कुंकू-माझा देश” या आंदोलनांतर्गत महिलांकडून मोदींना सिंदूर पाठवला जाईल. “सिंदूर के सन्मान में, शिवसेना मैदान में” अशा घोषणांसह हे आंदोलन पार पडेल. या सामन्याचा निषेध शिवसेना करणार आहे.
संजय राऊत यांनी यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अधोरेखित केली. “बाळासाहेब ठाकरे यांनी भारत-पाक सामन्याला कायम विरोध केला होता. जावेद मियाँदाद घरात आला तेव्हा त्यांनी त्याला स्पष्ट सांगितले होते की, चहा प्यायचा आणि निघून जायचं, सामन्याची वकिली इथे करायची नाही. एका बाजूला काश्मीरमध्ये रक्त सांडतंय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही क्रिकेट खेळायला येता? तुम्हाला लाज वाटत नाही का? हा प्रश्न भाजपला आहे. तुम्ही हिंदुत्ववादी आहात ना, मग निदान निषेध तरी करा,” असे त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.
Shashikant Shinde : मित्रपक्षांना बाजूला करण्याची भाजपची रणनीती
राऊत म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, महिलांचा आक्रोश थांबलेला नाही. आजही वेदना आहेत आणि अशा वेळी पाकिस्तानसोबत सामना खेळणे आम्हाला मान्य नाही. आमच्या महिला रस्त्यावर उतरतील,” असा इशाराही त्यांनी दिला.