Set up a state-level SIT to investigate the Shalarth ID scam : माजी शिक्षक आमदाराचा सवाल; राज्यस्तरीय एसआयटीची स्थापना करण्याची मागणी
Nagpur भाजपचे माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ही चौकशी फक्त नागपूरपुरता मर्यादित का ठेवण्यात आली आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचवेळी राज्यस्तरीय एसआयटी SIT ची स्थापना करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांना निवेदन दिले आहे.
नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून ५८० बनावट शिक्षक नियुक्त्या व शालार्थ आयडी प्रकरणे समोर आली आहेत. संबंधित प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काही अधिकाऱ्यांना अटकही झाली आहे. नागपूर पोलिस आयुक्तांनी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे, मात्र हा तपास फक्त नागपूरपुरता मर्यादित आहे.
Shani Shingnapur Temple : शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्टने 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले!
नियुक्तीसाठी एका एका शिक्षकाकडून ३०-४० लाख रुपये घेण्यात आले. तर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येकी ३-५ लाख घेऊन मान्यता दिल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठा भ्रष्टाचार झाला असून, पुण्याच्या शिक्षण आयुक्तांनी ५९ अधिकाऱ्यांवर दोषारोप ठेवणारा अहवाल सादर केला आहे.
दरम्यान, परभणीतील एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. राज्यभरातून बोगस नियुक्ती, शालार्थ आयडी आणि अल्पसंख्याक दर्जा घोटाळ्याच्या तक्रारी वाढत आहेत. हे प्रकरण शेकडो कोटींचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Anil Deshmukh : ‘स्थानिक’च्या निवडणुका होईपर्यंत जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राहतील
या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शिक्षण विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी आणि संबंधितांची मालमत्ता जप्त करण्यासाठी राज्यस्तरीय एसआयटी स्थापन करणे अत्यावश्यक असल्याची जोरदार मागणी होत आहे. याचा विचार करता राज्यस्तरीय एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी नागो गाणार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.