Nagpur Airport expansion project will be completed before deadline said Collector of Nagpur : जिल्हाधिकाऱ्यांचा दावा; गडकरी, फडणवीसांचा पूर्ण वॉच
Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी नागपूरच्या विमानतळाचे विस्तारीकरण चांगलेच मनावर घेतले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मार्ग मोकळा केल्यानंतर तातडीने काम सुरू करण्यात आले. त्यानंतर दोघेही सातत्याने या कामावर वॉच ठेवून आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी मुदतीपूर्वी काम पूर्ण करू, असा दावा केला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या विस्तारीकरणाकडे संपूर्ण विदर्भासह मध्य भारताचे लक्ष लागले आहे. येथील औद्योगिक विकासासमवेत रोजगार निर्मितीला चालना देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे या कामाला आता गती देण्यात आली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृतीगट तयार करण्यात आला आहे. प्रलंबित कामासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
कोणत्याही परिस्थितीत प्रशासकीय पातळीवरचे उर्वरीत कामे मुदतीपुर्वी पूर्ण करायचे आहे. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा मिहान इंडिया लिमिटेचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी, दि. ८ जानेवारीला विमानतळ विस्तारीकरणाबाबत मिहान इंडियाच्या कार्यालयीन सभागृहात व्यापक बैठक झाली.
या बैठकीला मिहान इंडिया लिमिटेडचे नियोजन सदस्य तथा संचालक अनिलकुमार गुप्ता, जीएमआर गृपचे कार्यकारी संचालक एस.जी.के. किशोर, भारतीय वायुसेनेचे स्टेशन कमांडर शिव कुमार, पोलीस उपायुक्त लोहित मतानी, वरिष्ठ विमानतळ संचालक अबिद रुही, एमएडीसीचे प्रकाश पाटील, मुख्य अभियंता एस.के. चटर्जी, भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या समन्वय प्रमुख लॅली मेरी फ्रन्सीस, महानगर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद गावंडे, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Sexual abuse of a child by Hostel superintendent : वसतिगृह अधीक्षकाच्या विकृतीचा कळस !
भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत असलेले क्षेत्र मिहान इंडिया लिमिटेड कंपनीला हस्तांतरीत करायचे आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता लवकर मिळावी. यादृष्टीने मंजूरी दिल्याप्रमाणे परिपूर्ण प्रस्ताव सर्व संबंधित यंत्रणांकडून तपासून पाठविला जात आहे. याचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. विमानतळ विस्तारीकरण प्रकल्पांतर्गत अधिसूचीत असलेल्या क्षेत्रातून खाजगी वाहतूक पुर्णत: बंद करण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
महानगर पालिकेतर्फे सद्यस्थितीत सुरु असलेली आपली बस सेवा आता या अधिग्रहीत जागेतून जाणार नाही. महानगर पालिकेला याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले. भारतीय वायुसेनेच्या स्थलांतरीत जागेवर उपलब्ध करुन द्यावयाच्या सुविधा व पोच मार्गाचे काम तातडीने सुरु करण्याबाबतही या बैठकीत कालमर्यादा आखून दिली आहे.