Fraud with Congress official; Accused also belongs to Congress : राणा दाम्पत्याचे नाव घेतले; रेल्वे बोर्डात नियुक्तीच्या नावाखाली लुटले
Nagpur रेल्वे बोर्डात नियुक्तीच्या नावाखाली काँग्रेस महिला पदाधिकाऱ्याला १५ लाखांचा गंडा घालण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे फसवणूक करणारे आरोपीदेखील काँग्रेस पक्षाचेच पदाधिकारी आहे. त्यांनी रवी राणा Ravi Rana व नवनीत राणा Navneet Rana यांचे नाव घेत महिला पदाधिकाऱ्याला जाळ्यात ओढले. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
भारती सुनील कामडी (३९, महालक्ष्मीनगर, नरसाळा) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या जिल्हा काँग्रेस कमिटीत सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांची एका पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून अमरावतीतील हर्षवर्धन सपकाळ, संदीप देशपांडे व चेतन हरीदास चौधरी यांच्याशी ओळखी झाली. संदीप देशपांडेची रवी राणा व नवनीत राणा यांच्याशी ओळखी आहे. त्याने पत्नीची रेल्वे बोर्डावर नियुक्ती करून घेतली आहे अशी बतावणी केली.
सपकाळने मी तुमची नेमणूक करवून देतो असे आमिष कामडी यांना दाखविले. ११ जुलै २०२३ रोजी धंतोलीत चौघेही भेटले व नियुक्तीसाठी १५ लाख रुपये लागतील असे देशपांडेने सांगितले. कामडी यांनी विचार करून सांगते असे उत्तर दिले होते. मात्र नियुक्तीसाठी अनेक जण इच्छुक असून काम करायचे असेल तर लवकरात लवकर पैसे द्या असे फोन आरोपींनी केले.
DCM Ajit Pawar : उपमुख्यमंत्र्यांनी केले जिल्हा प्रशासनाचे कौतुक
कामडी यांनी नातेवाइकांकडून पैसे उधार घेत १० लाख रुपये चौधरीच्या बँक खात्यात वळते केले व जुलै २०२३ मध्ये पाच लाख रुपये नगदी दिले. मात्र त्यानंतर कुठलीही नियुक्ती झाली नाही. कामडी यांनी विचारणा केली असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनी नंतर फोन उचलणेदेखील बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर कामडी यांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.






