Breaking

Nagpur congress : कुणाल राऊतांची प्रियांका गांधींच्या ‘रोड शो’ला दांडी का?

Why Kunal Raut wa absent in ‘Road Show’ for Priyanka Gandhi? : उचलबांगडी झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सवाल

Nagpur युवक कॉंग्रेसमधून ६० पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी झाल्याचा वाद आता चांगलाच पेटला आहे. या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. राऊत हे नियमित बैठका घेत नाहीत. त्यांनी निवडणूकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या रोड शो ला दांडी का मारली होती असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

रविवारी युवक कॉंग्रेसने सरसंघचालकांविरोधात केलेल्या आंदोलनात अनुपस्थित असल्याचे कारण देत ६० पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात आले होते. त्यावरून आता ते पदाधिकारी संतापले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसच्या राष्ट्रीय महसचिव प्रियांका गांधी यांचा पश्चिम नागपूर व मध्य नागपुरात ‘रोड शो’ आयोजित करण्यात आला होता. कुणाल राऊत हे नागपुरात असूनही या ‘रोड शो’मध्ये सहभागी झाले नाहीत. त्यामुळे त्यांना याचा जाब विचारण्यात यावा, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.

Robbed at gunpoint : बंदुकीच्या धाकावर लुटले; सव्वा दोन लाखांचे दागिने पळविले

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनाच तत्काळ प्रभावाने पदमुक्त करण्याची मागणी राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय प्रभारी यांच्याकडे केली जाणार आहे. युवक काँग्रेसच्या निवडणुकीत कुणाल राऊत यांना मतदान न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना ते ठरवून टार्गेट करीत असल्याचा गंभीर आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. बंटी शेळके हे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आहेत. ते विधानसभा निवडणूक लढलेल्या मतदारसंघात हे आंदोलन होते. मात्र, केवळ क्रेडिट घेण्यासाठी त्यांनाही या आंदोलनाची पूर्वकल्पना देण्यात आली नाही, असा आरोपही पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Mahayuti Government: जिल्ह्यातील शक्तीस्थळे ओळखून विकास आराखडा तयार होणार

कुणाल राऊत हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. अध्यक्ष म्हणून गेल्या ९ महिन्यांपासून त्यांनी प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेतलेली नाही. याकडेदेखील या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.