Breaking

Nagpur District BJP : भाजपचे जिल्हाध्यक्ष लागले कामाला, कार्यकर्त्यांनाही दिल्या सूचना

Targeted complete victory in the local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संपूर्ण विजयाचे ध्येय

Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गाव पिंजून काढू. जास्तीत जास्त लोकांना भाजपशी जोडू. जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांवर भाजपचा झेंडा फडकवू, असा संकल्प नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत व मनोहर कुंभारे यांनी व्यक्त केला केला आहे.

त्यांच्या पदग्रहण सोहळ्याला आ. चरणसिंग ठाकूर, माजी आ. सुधाकरराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, उदयसिंग यादव, महामंत्री संध्या गोतमारे, अनिल निदान, अजय बोढारे, रामराव मोवाडे आदी उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा मांडला.

MP & MLA of Nagpur : रेल्वेचे अधिकारी तर खासदारांनाच तोरा दाखवतात

आजवर भाजपचा एकच जिल्हाध्यक्ष असायचा. यावेळी भाजपने नागपूर जिल्ह्याची दोन भागांत विभागणी करीत दोन जिल्हाध्यक्ष नेमले. त्यामुळे पक्ष कार्यालयात आता दोन्ही जिल्हाध्यक्षांसाठी आजूबाजूला दोन खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. दोन्ही जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत व मनोहर कुंभारे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जि.प.निवडणूकींना डोळ्यासमोर ठेवून नियोजन सुरू केले आहे.

Nagpur Municipal Corporation : नाईक तलावाचे अस्तित्व टिकवण्यासाठी मनपाची धडपड!

नव्या अध्यक्षांनी जोमाने काम करून पक्षाला बळकटी देण्याचे आवाहन कोहळे यांनी केले. नागपूर ग्रामीणचे दोन जिल्हे झाले आहेत. नव्या दमाच्या नेत्यांना संधी दिली आहे. दोन्ही जिल्हाध्यक्षांनी संघटनेच्या कामासाठी वाहून घ्यावे. पक्षाचे संघटन पर्व सुरू आहे. जिल्हा कार्यकारिणी, मंडळ कार्यकारिणी, विशेष कार्यकारी अधिकारी, शासकीय समित्या तयार करायच्या आहेत, तालुक्यांचा प्रवास करायचा आहे.

आगामी निवडणुकांसाठी कार्यक्रमाची रचना करायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दोन्ही जिल्हाध्यक्षांची पहिली टेस्ट आहे. यात ते यशस्वी होतील, असा विश्वास डॉ. पोद्दार यांनी व्यक्त केला.