Breaking

Nagpur district congress: निलंबित राजेंद्र मुळक काँग्रेसच्या बैठकीत

Suspended Rajendra Mulak in Congress meeting : प्रभारी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांना निमंत्रणच नाही

Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीची तयारी करण्यासाठी मंगळवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेसची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राजेंद्र मुळक यांची उपस्थिती आणि प्रभारी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांना न देण्यात आलेले निमंत्रण या बाबी अनेकांची भुवया उंचाविणारी ठरली.

विधानसभा निवडणूकीदरम्यान मुळक यांना कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. मात्र तरीदेखील ते बैठकीत आल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. कार्यकारी अध्यक्ष अश्वीन बैस यांनी ही बैठक बोलविली होती. यावेळी खा. श्यामकुमार बर्वे, आ. संजय मेश्राम, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, रश्मी बर्वे, माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी सभापती अवंतिका लेकुरवाळे, देवेंद्र गोडबोले आदी उपस्थित होते.

Akash Fundkar : लहान कलाकारांवर अन्याय होऊ देणार नाही !

या बैठकीला प्रभारी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांना निमंत्रणच नव्हते. जिल्हा ग्रामीण काँग्रेसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीचे आपण प्रभारी जिल्हाध्यक्ष असूनही निमंत्रण देण्यात आले नाही. असे असतानाही आपण पक्षहितासाठी कार्यालयात सर्व व्यवस्था करून दिली असे आष्टनकर यांनी स्पष्ट केले.

तर मुळक यांच्या उपस्थितीमुळे त्यांची घरवापसी होणार का या चर्चा सुरू झाल्या. निवडणूकीत मला मिळालेली ८२ हजार मते ही काँग्रेसची आहेत. त्यामुळे नैतिकता म्हणून आपण जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित राहिलो. मी उमरेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराला जावून निवडून आणले. रामटेकमध्ये मला काँग्रेसचे चिन्ह मिळाले तर मीदेखील विजयी झालो असतो. कार्यकर्त्यांच्या भावनेची पश्रश्रेष्ठींनीच दखल घ्यावी, असेही मुळक म्हणाले.

Ashish Shelar : यावर्षीपासून साजरा होणार आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव !

पक्षांतर्गत राजकारण कायम
काँग्रेसमधील पक्षांतर्गत राजकारण विधानसभा निवडणुकीच्या वेळी चव्हाट्यावर आले होते. निवडणुकीत मोठा पराभव झाल्यावर काँग्रेसमधील सर्व गट एकमेकांवर आरोप करायला लागले. आता मुळक यांच्या बैठकीतील उपस्थितीमुळे अंतर्गत राजकारण कायम असल्याचे सिध्द झाले आहे.