Old NIT building will be demolished Nagpur Improvement Trust : नव्या इमारतीचा ठराव; जागेचा वापर बदलण्यासाठीचा प्रस्ताव
Nagpur उत्तर अंबाझरी मार्गावरील नागपूर सुधार प्रन्यासच्या विभागीय कार्यालयाची इमारत पाडण्यात येणार आहे. त्याठिकाणी असलेले सभागृह पाडून भव्य इमारत उभी राहणार आहे. यासाठीचा निर्णय नासुप्रच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. नवी इमारत बांधण्यासाठी जागेचा वापर बदलविण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
शहराचा विस्तार आणि वाढत्या कामाचा व्याप लक्षात घेता नासुप्रची अंबाझरी परिसरातील इमारत अद्ययावत करण्यात येत आहे. ४३ हजार ५६६ चौरस मिटर जागेवर १३ मजली इमारत उभी राहणार आहे. सध्या असलेल्या दुकानदारांचे पुनर्वसन करण्यासाठी ५ हजार ३३७ चौरस मिटरचे बांधकाम राखीव ठेवण्यात येणार आहे. या इमारतीत नासुप्रच्या कार्यालयांसह रहिवासी क्षेत्र, वाणिज्यिक, हॉटेल आणि इतर कार्यालयांसाठीही जागा उपलब्ध करून दिली जाईल. लिजच्या माध्यमातून ही कार्यालये उपलब्ध करून दिली जातील.
Nagpur Improvement Trust : नागपुरातील शिवसृष्टी प्रकल्प रखडला !
पार्किंगची गरज लक्षात घेता तळघरात तीन पार्किंग तयार केले जातील. इमारत तयार झाल्यानंतर दुकाने आणि कार्यालयांचा लिलाव केला जाईल. डीबीएफओएमएस (डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेशन अॅण्ड मेन्टनन्स) या तत्त्वावर ही इमारत बांधण्याचे काम देण्यात आले आहे. १० डिसेंबर रोजी याची निविदा उघडण्यात आली असून १२० कोटी ४६ लाखांचा महसूल नासुप्रला प्राप्त होणार आहे. विदर्भ इन्फोटेक प्रा. लि. यांना हे काम देण्यात आले आहे.
Women unsafe in Nagpur, Nagpur Police : महिला वकिलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार !
नासुप्रच्या विश्वस्त मंडळाने १० डिसेंबरलाच या निवेदनाला मंजुरी दिली. ५ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याची कालमर्यादा आखण्यात आली आहे, असे नासुप्रकडून सांगण्यात आले.