Citizens protest at the municipal headquarters : कारभारावर संताप; पूर्व नागपुरातील समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचा सूर आहे. पूर्व नागपुरातील प्रभाग २३ अंतर्गत विविध समस्यांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या मुख्यालयातच आंदोलन केले.
कुंभारटोली येथील नागनदीच्या सुरक्षाभिंतीचे बांधकाम कार्यादेश होऊनही सुरू झालेले नाही. पावसाळ्याच्या तोंडावर नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शास्त्रीनगरातील उद्यानामध्ये गैरप्रकार सुरू आहे. रात्रीला जुगारी व दारुड्यांची मैफल रंगते. त्याचा रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. या उपद्रवींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
Shyamkumar Barve : खासदार बर्वेंचे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र
परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दुरवस्था झाली आहे. वॉकिंग ट्रॅक खराब झाला असून, पावसाळ्यात ट्रॅकवर पाणी साचलेले असते. त्यामुळे घसरून पडण्याची भीती आहे. उद्यानातील प्रसाधनगृह व शौचालय खराब आहे. सायंकाळी उद्यानातील लाइट बंद असल्याने असामाजिक तत्त्वांकडून उपद्रव केला जातो. उद्यानात सुरक्षारक्षक नसल्याने उद्यानाचे नुकसान होत आहे.
आदर्शनगर झोपडपट्टी येथील नाल्याची नवीन सुरक्षाभिंत बनविण्याचे काम सुरू करावे. यासह अन्य मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. नागपुरातील इतर भागांतील नागरिकांमध्येदेखील नाराजीचा सूर आहे. विशेषत: मान्सूल शहरात आला असतानादेखील नाल्यांचे काम झालेले नाही. तसेच सिमेंट रस्त्यांचे कामदेखील संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्या ठिकाणी प्रचंड दुरावस्था होण्याची चिन्हे आहेत.
MLA Manoj Kayande : चांदणी तलाव विकासात पुरातत्त्व खात्याचा अडथळा
माजी नगरसेवक बाल्या बोरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात मोनू सातपुते, मच्छिंद्र सिलवेरू, राजू रायसने, सुरेश हागडे, वैशाली फुलझेले, वंदना महाजन, ममता जैस्वाल, पुरुषोत्तम बिजवार, पिंटू धोसेवान, राकेश बारई, युवराज बिल्लोरे, प्रवीण जुनघरे, राजेंद्र मेश्राम, कृष्णा गजभिये, रवी बोरकर, राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते. यावेळी बोरकर यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन देऊन अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्यावर नाराजी व्यक्त केली.