Breaking

Nagpur Municipal Corporation : दोन माळ्यांचे रुग्णालय, २४ आपात्कालीन सेवा, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया!

Construction of NMC’s fourth hospital is in progress : महानगरपालिकेचे चौथे रुग्णालय लवकरच; आयुक्तांनी केली कामाची पाहणी

Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या संथ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतात. पण आरोग्य यंत्रणेने कोरोनाकाळात लोकांना साथ दिली. महापालिकेच्या तिन्ही रुग्णालयांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका या काळात बजावली. आता यामध्ये आणखी एका रुग्णालयाची भर पडणार आहे. यामध्ये चोवीस प्रकारच्या आपात्कालीन सेवा, ओपीडी, शस्त्रक्रिया आदींचा समावेश असणार आहे.

शहरात महानगरपालिकेची आयसोलेशन, इंदिरा गांधी रुग्णालय व पाचपावली येथील स्त्री रुग्णालय अशी तीन रुग्णालये आहेत. आता यात आणखी एका रुग्णालयाची भर पडणार आहे. मिनीमाता नगरात ३० बेडच्या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. लवकरच ते रुग्णसेवेत असणार आहे. या रुग्णालायात बाह्यरुग्ण विभागासह २४ तास आपत्कालीन सेवा उपलब्ध होणार आहे.

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर दीर्घकाळ चालले असते तर इतिहास वेगळा असता

कोरोनाकाळात या तिन्ही रुग्णालयांची मोठी मदत झाली. आता यात मिनीमातानगरातील मनपा रुग्णालयाची भर पडणार आहे. गुरुवारी या रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी केली. मिनीमानगर येथील मनपा रुग्णालय हे दोन माळ्यांचे असणार आहे.

या नागरी सामुदायिक आरोग्य केंद्रात (यूसीएचसी) ओपीडी, आयपीडी ची व्यवस्था असेल. नवजात शिशू, बालरोग, स्त्रीरोग, नेत्र, दंत यासह २४ तास आपात्कालीन सेवा, रेडिओलॉजी सेवा, शस्त्रक्रिया या सर्व सुविधा या रुग्णालयांमधून दिल्या जाणार आहेत.

Malkapur administration : रमाई घरकुलच्या लाभार्थ्यांना मोफत रेती

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, मुख्य अभियंता मनोज तालेवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त विजय थूल, उपअभियंता राजीव गौतम, देवचंद काकडे, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, शहर लेखा व्यवस्थापक नीलेश बाभरे, झोनचे शाखा अभियंता जगदीश बावनकुळे, कंत्राटदार संजय मेडपल्लीवार आदी उपस्थित होते.