Nagpur Municipal Corporation Elections : अर्ज मागे घेण्यासाठी दबाव, खोलीत डांबून ठेवले

BJP Issues AB Forms to Two Candidates from the Same Ward : भाजपचा प्रताप, एकाच प्रभागातून दोघांना दिला होता एबी फॉर्म

Nagpur भाजपने नागपूरमध्ये एकाच जागेसाठी दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने मोठा असंतोष उसळून आला आहे. प्रभाग क्रमांक तेरामधील भाजपने किसन गावंडे आणि विजय होले या दोघांना एबी फॉर्म देण्यात आला होता. यापैकी होले यांचा अर्ज स्वीकृत झाला आहे. गावंडे यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी नेते दबाव टाकत असल्याचे बघून कार्यकर्त्यांनी त्यांना घरात कोंडून ठेवले होते. यावरून प्रचंड गदारोळ उडाल्यानंतर आमदार परिणय फुके आणि माजी आमदार सुधाकर देशमुख यांच्या माध्यमातून गावंडे यांची कार्यकर्त्यांच्या गराड्यातून सुटका करण्यात आली. त्यांची उमेदवारी मागे घेण्यास भाजपला यश आले आहे.

किसन गावंडे हे देशमुख यांचे कट्टर समर्थक आहे. ते पश्चिम मंडळाचे अध्यक्ष होते. महापालिकेच्या निवडणुकीत प्रबळ दावेदार असतानाही भाजपने होले यांच्या नावावर शिक्कमोर्तब केले. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी त्यांना एका घरात कोंडून ठेवण्यात आले होते. आमदार परिणय फुके यांनी गावंडे यांना मोठी जबाबदारी देण्यात येईल, झालेला अन्याय दूर केला जाईल असे आश्वासन देऊन कार्यकर्त्यांचा रोष शांत केला. महापालिकेच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ आहे.

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा

भाजपच्या नेत्यांकडे बंडखोरांना थंड करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नागपूरमध्ये एकूण सहा प्रभागांतील एका जागेवर भाजपने दोघांना एबी फॉर्म दिला आहे. याशिवाय अनेक बंडखोरांनी रिंगणात उडी घेतली आहे. बाहेरच्यांना दिलेल्या उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. १५१ जागेसाठी १८०० कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली होती. उमेदवारांची नावे आधीच जाहीर केली तर मोठा गोंधळ उडण्याची शक्यता वर्तविली जात होती. याची खबरदारी भाजपने आधीच घेतली होती. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून बोलवून प्रत्येकाच्या हाती एबी फॉर्म दिला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर अधिकृत उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली होती.

Municipal election : निष्ठावंतांचा उठाव, जोरगेवारांचा डाव पूर्णतः फसला!

सर्वाधिक चुरस व प्रबळ दावेदार असलेल्या प्रभागांमध्ये दोघांना एबी फॉर्म देण्यात आले होते. मात्र ज्या उमेदवाराने आधी अर्ज भरला त्याचा फॉर्म स्वीकारण्यात आला आहे. दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्म रद्द झाला आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे वास्तव्य असलेल्या प्रभागात श्रीकांत आगलावे आणि सुबोध आचार्य तर महाल परिसरातून बंडू राऊत आणि धीरज चव्हाण यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. आगलावे आणि राऊत यांचा अर्ज स्वीकृत झाला आहे. मागील निवडणुकीत याच जागेवरून भाजपात मोठा असंतोष उसळून आला होता.

New controversy : राहुल गांधी आणि प्रभू श्रीरामांच्या संदर्भावरून राजकीय वातावरण तापले

आगलावे आणि आचार्य यांचे कार्यकर्ते एकमेकांवर भिडले होते. मोठा राडा होण्याची शक्यता निर्माण झाली होती. शेवटी गडकरी यांनी दोघांचेही तिकीट कापले होते. यावेळी पुन्हा दोघांना एबी फॉर्म देऊन भाजपने आणखीच वाद ओढवून घेतला आहे. भाजप नेत्यांमधील भांडणामुळे बंडू राऊत यांचा धक्कादायक पराभव झाला होता. धीरज चव्हाण यांना तिकीट देण्याचे भाजपने ठरवले होते. मात्र बंडू राऊत यांनी हट्ट करून तिकीट आणले होते.