Expressed anger over the slow pace of road works : मनपा आयुक्त संतापले; नागरिकांना मनःस्ताप होऊ देऊ नका
Nagpur नागपूर शहरात सर्वत्र रस्त्यांची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी कामे अर्धवट करून सोडून देण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आणि कामच सुरू झालेले नाही. या संपूर्ण प्रकारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुढील एक ते दिड महिन्यात ही कामे मार्गी लागली नाहीत, तर पावसाळ्यात प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागणार आहे. या एकूणच परिस्थितीवर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील रस्त्यांची कामे कासवगतीने होत आहेत. संथगतीने कामे सुरू असल्यामुळे लोक वैतागले आहेत, या शब्दांत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. बजाजनगरातील रस्त्याचे बांधकाम अतिशय संथगतीने होत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सोमवारी मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी व पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांनी रस्त्याची पाहणी केली असता, आयुक्तांनी कामाप्रती नाराजी व्यक्त केली.
Washim BJP : वाशीममध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यावर भाजपचा विश्वास!
यासंदर्भात आयुक्तांनी प्रकल्प विभागाकडून कंत्राटदाराला नोटीस देण्याचे निर्देश दिले. महानगरपालिकेतर्फे सुरळीत वाहतुकीच्या दृष्टिकोनातून शहरातील विविध चौकांचा विकास करण्यात येत आहे. आयुक्तांनी नागपूर विद्यापीठ वाचनालय चौक, रामदासपेठ पूल, बजाजनगर चौक आदी रस्त्यांची पाहणी केली. पायी चालणाऱ्या नागरिकांनासुद्धा लाभ झाला पाहिजे, तसेच वाहतुकीला अडथळा येऊ नये, असे काम करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
Akola BJP : अकोल्यात भाजपचे ओबीसी कार्ड; जयंत मसनेंवर विश्वास कायम!
उपायुक्त चांडक यांनी वाहतुकीच्या दृष्टीने विकासकामांमध्ये दुरुस्ती सुचविली. वाहतूक विभागातर्फे चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी मार्किंग करणे, सूचना फलक लावण्याचे निर्देश दिले. रामदासपेठ येथे करण्यात आलेल्या कामावर समाधान व्यक्त केले. यावेळी कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधाडे, अल्पना पाटणे, विजय गुरुबक्षाणी, सह पोलिस आयुक्त माधुरी बाविस्कर, उपअभियंता प्रमोद मोखाडे, राहुल देशमुख, मनोहर राठोड, आनंद लमसोंगे, हर्षल बोपर्डीकर व प्रताप भोसले आदी उपस्थित होते.