Garbage collection company employees go on strike : कचरा उचलणार कोण? आर्थिक पिळवणुकीचा आरोप
Nagpur उपराजधानीसमोर मोठे कचरा संकट उभे ठाकले आहे. शहराच्या कचरा उचलणाऱ्या ए.जी.एन्व्हायरो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्याचा फटका थेट रस्त्यांवर दिसू लागला आहे. नागपूर शहर अक्षरशः कचऱ्यात बुडाले आहे. शहरातील ५ झोनची कचरा संकलनाची जबाबदारी ए. जी. एन्व्हायरो कंपनीची आहे. मात्र, या कंपनीचे नागपुरातील वरिष्ठ अधिकारी कचरा संकलन कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहे.
कोणत्याही कारणावरून कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याची धमकी दिली जात आहे. अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या आर्थिक व मानसिक अत्याचारामुळे ए. जी. एन्व्हायरो कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष असून, गेल्या दोन दिवसांपासून या कर्मचाऱ्यांनी ५ झोनमधील घराघरांतून कचरा संकलनच बंद केले आहे.
Nagpur Municipal corporation election : मनपा निवडणुकीत भाजप पाळणार नाही ‘महायुतीचा धर्म’?
यामध्ये लक्ष्मीनगर, धरमपेठ, धंतोली, हनुमानगर व नेहरूनगर झोनचा समावेश आहे. शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी कचरा संकलनाच्या गाड्याच काढल्या नाही. कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की महिनाभर नियमित काम करून, बायोमेट्रिकद्वारे हजेरी घेतल्यानंतरही दर महिन्यात कर्मचाऱ्यांच्या २ ते ३ हजेऱ्या कापल्या जातात. त्याचा पगारही मिळत नाही. कधीकधी काम करूनही आठवड्याभराच्या जबरदस्तीने सुट्ट्या लावल्या जातात. कुटुंबाची जबाबदारी असल्याने कर्मचारी काम करण्यास मजबूर आहे.
Zilla Parishad Nagpur : पती-पत्नी एकत्रीकरणात प्रशासनाचा खोडा, शिक्षकांना मनःस्ताप
कर्मचाऱ्यांनी तर प्रकल्प प्रमुखाला कामावरून काढण्याची मागणी केली आहे. त्याच बरोबर कर्मचाऱ्यांना ५ महिन्यांपासून पगार स्लीप दिलेली नाही. रात्री पाळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अवाजवी काम करून घेतले जाते. कर्मचाऱ्यांच्या ईएलची रक्कम १५ तारखेच्या आत देण्यात यावी आदी मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने ५ झोनमधील घराघरांतील कचरा संकलन बंद आहे.