municipal-corporation/nagpur-nmc-bjp-nominated-members-list-senior-leaders-rehabilitation : काँग्रेसच्या आक्रमक फळीला रोखण्यासाठी अनुभवी ‘गुरूजीं’ना संधी; संदीप जाधव, धर्मपाल मेश्राम यांच्यासह निष्ठावंतांच्या नावांची चर्चा; ‘सतावेध’ विशेष राजकीय विश्लेषण
Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे १०२ नगरसेवक निवडून आले. भाजपने पुन्हा एकदा महापालिकेत आपली सत्ता प्रस्थापित केली. मात्र, यावेळी भाजपच्या काही ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांना पराभवाचा धक्का बसला आहे. सध्याच्या सभागृहात चार-पाच सदस्य वगळता नव्या नगरसेवकांचा भरणा अधिक आहे. त्या तुलनेत विरोधी बाकांवरील काँग्रेसमध्ये अनेक आक्रमक नगरसेवक आहेत. या अनुभवी विरोधकांचा सामना करण्यासाठी, पराभूत झालेल्या काही ज्येष्ठ नेत्यांना ‘स्वीकृत सदस्य’ म्हणून महापालिकेत पाठवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.
स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त होणाऱ्या नावांमध्ये माजी उपमहापौर संदीप जाधव यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. जाधव यांचा अवघ्या ८३७ मतांनी पराभव झाला. महापालिकेचे माजी कर्मचारी असल्याने त्यांना मालमत्ता कर विभागासह प्रशासकीय कामकाजाची खडाखडा माहिती आहे. भाजपचे दुसरे प्रमुख दावेदार धर्मपाल मेश्राम हे अनुसूचित जाती आयोगाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यांच्या प्रभागातून भाजपचे तीन नगरसेवक निवडून आले असून, मेश्राम यांचे राजकीय पुनर्वसन निश्चित मानले जात आहे.
Pune MIT vandalism : पुण्यात एमआयटीच्या सांस्कृतिक महोत्सवात राडा; बांगलादेशी स्टॉलची तोडफोड!
निवडणुकीत तिकीट कापल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढताना त्यांना दिलेली आश्वासने आता भाजपला पाळावी लागणार आहेत. पक्षाने दिलेला ‘एबी फॉर्म’ शेवटच्या क्षणी मागे घेण्यास सांगितल्याने किशन गावंडे नाराज होते. त्यांची समजूत काढण्यासाठी आमदार परिणय फुके आणि माजी आमदार सुधाकर देशमुख यांना मध्यस्थी करावी लागली होती. त्यांना स्वीकृत सदस्यत्वाचे आश्वासन देण्यात आले आहे.
Nashik Mahavitaran : नाशिकमध्ये सरकारी जमिनीवर ‘भू-माफियांचा’ डोळा; गुन्हा दाखल करण्याची मागणी
पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी १० वर्षांपासून सांभाळणारे प्रमोद पेंडके हे आमदार कृष्णा खोपडे यांच्या जवळचे मानले जातात. पूर्व नागपूरमधील २५ पैकी २३ नगरसेवक निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा असून, कोणत्याही अपेक्षेशिवाय काम करणाऱ्या अशा सेवाभावी कार्यकर्त्याचा विचार होण्याची शक्यता आहे. याशिवाय माजी नगरसेवक भगवान मेंढे, दक्षिण मंडळाचे अध्यक्ष संजय ठाकरे, देवेंद्र दस्तुरे, सुबोध आचार्य आणि संजय चिंचोळे यांचीही नावे चर्चेत आहेत.








