Breaking

Nagpur Municipal Corporation : नाईक तलावाचे अस्तित्व टिकवण्यासाठी मनपाची धडपड!

NMC’s efforts to preserve the existence of Naik Lake : आयुक्तांचे तलावाच्या पाझर स्रोताचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश

Nagpur अमृत योजनेअंतर्गत नाईक तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत टप्पा १ ची कामे पूर्ण झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या कामांसोबतच नाईक तलावाचे अस्तित्व टिकविण्यासाठी पाझर स्रोत निश्चित करण्याची गरज आहे. त्यासाठी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी व्हीएनआयटीला तलावाच्या पाझर स्रोताचे विस्तृत सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले.

केंद्र सरकारच्या अमृत योजना टप्पा २ अंतर्गत नाईक तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पामध्ये तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी सरकारकडे सादर करावयाच्या प्रस्तावित कामाचा आढावा आयुक्तांनी घेतला. योजनेअंतर्गत टप्पा १ मध्ये झालेल्या कामाची पाहणी त्यांनी केली. नाईक तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचे दोन टप्प्यात काम होत आहे. यापैकी पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. यात नाईक तलावातील गाळ काढणे, तलावाचे खोलीकरण तसेच संरक्षण भिंत बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे.

Bogus school ID case : वैशाली जामदार यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी !

दुसऱ्या टप्प्याचे काम प्रस्तावित आहे. यात तलावाच्या सौंदर्यीकरणावर भर दिला जाणार आहे. या टप्प्यात करावयाच्या कामाचा प्रस्ताव सरकारकडे सादर करावयाचा आहे. या टप्प्यात पादचारी मार्ग तयार करणे, विद्युत व्यवस्था उभारणे, संरक्षण भिंत बांधणे, हिरवळ तयार करणे त्याचप्रमाणे पाझर तलावाच्या स्रोताबाबत सर्वेक्षण करण्याचे काम होणार आहेत.

Rural Maharashtra : पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासींना आजही गाठावा लागतो लांबचा पल्ला !

आयुक्तांच्या पाहणीदरम्यान व्हीएनआयटी संस्थेचे डॉ. अविनाश वासुदेवन यांनी नाईक तलावात येणाऱ्या संभाव्य पाझर स्रोताबाबत सर्वेक्षण करून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे आयुक्तांना सांगितले. यावेळी आयुक्तांनी पाझर स्रोताबाबत व्हीएनआयटी संस्थेला विस्तृत सर्वेक्षण करण्याबाबत निर्देश दिले. शिवाय पावसाळा सुरू होताच नाईक तलावामधील पान कांदा काढण्याचेही आयुक्तांनी आदेश दिले.