There may be an auction of the seized property of the defaulters : नागपूर महानगरपालिका कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत
Nagpur थकबाकीदारांना महापालिकेने अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केल्यानंतरही थकबाकीदार मालमत्ता कर भरण्यासाठी उत्सुक नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने थकबाकीदारांच्या संपत्तीची जप्तीची मोहीम राबविली आहे. यात २० फेब्रुवारीपर्यंत महापालिकेने १४०६१ संपत्तीची जप्ती केली आहे. यांच्यावर ९९ कोटी ५५ लाख ५० हजार रुपयांचा कर थकीत आहे.
कारवाईदरम्यान २२८५ थकबाकीदारांनी १७ कोटी ८५ लाख ९६ हजार रुपये भरून संपत्तीची लिलाव थांबविला आहे. तर ६,२५८ संपत्तीवर वॉरंट कारवाई करून पुढची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांच्यावर ६७ कोटी ८३ लाख ५७ हजार रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. यामध्ये बऱ्याच वर्षापासून मालमत्ता कर न भरलेले १३२ थकबाकीदाराचा वृत्तपत्रात हुकूमनामा प्रकाशित केला आहे.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी Good News!
ज्या थकबाकीदारांचा हुकूमनामा प्रकाशित करण्यात आला आहे, त्यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे. मालमत्ता कर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, हुकूमनामा प्रकाशित केल्यानंतर थकबाकीदार मालमत्ता कर भरत असेल तर त्याच्या संपत्तीचा लिलाव होणार नाही. सध्या थकबाकीदारांसाठी अभय योजना एक चांगली संधी आहे. यात ८० टक्के दंडाची रक्कम माफ करण्यात आली आहे.
आसीनगर झोनमध्ये थकबाकीदारांची मोठी यादी आहे. झोनला रोजचा ९० लाखांहून अधिकचे वसुलीचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे झोनमध्ये सर्वाधिक ३१९२ संपत्ती जप्त करण्यात आल्या आहेत. तर जप्तीच्या कारवाईत धरमपेठ झोन सर्वांत मागे आहे. येथे केवळ ५१२ संपत्ती जप्त केल्या आहेत.
Devendra Fadanvis : नीलम गोऱ्हे त्या पक्षात होत्या, त्यामुळे त्यांना ते चांगले ठाऊक आहे !
कारवाईदरम्यान मंगळवारी झोनमध्ये सर्वाधिक ४९९ लोकांनी ३ कोटी ८९ लाख ६ हजार रुपये मालमत्ता कराचा भरणा करून आपली मालमत्ता लिलाव होण्यापासून वाचविली आहे. दुसऱ्या क्रमांकावर हनुमाननगर झोन आहे, येथे ४६८ थकबाकीदारांनी ३.३४ कोटी रुपये जमा केले आहेत. धरमपेठ झोनमध्ये सर्वांत कमी ७७ थकबाकीदारांनी ४४.४८ लाख रुपये जमा केले आहेत.