Nylon manja worth rs.30 lakhs destroyed : पोलिसांच्या ‘रोड रोलर’ची उपराजधानीत धूम
Nagpur नागपूरचे पोलीस आयुक्त Nagpur police commissioner डॉ. रविंद्र सिंगल Dr Ravinder Singal IPS यांनी अवैध कारवायांवर रोड रोलर फिरविण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी बुलेटच्या सायलेंसरवरून रोड रोलर फिरवला. नागपूरकरांच्या कानठळ्या बसविणारे सायलेंसर नष्ट केले. आता जीवावर उठलेल्या नायलॉन मांज्यालाही त्यांनी रोलरखाली आणले आहे. नागपूर पोलिसांच्या या रोड रोलरने सध्या चांगलीच धूम केली आहे.
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात पतंग उडवल्या जातात. यात पर्यावरणास तसेच मानवी जीवितास धोकादायक असलेल्या नायलॉन मांजाचा वापर केला जातो. हा मांजा शासनाने प्रतिबंधित Banned केला असला तरी छुप्या मार्गाने त्याची विक्री केली जात आहे. अशा विक्रेत्यांवर छापा टाकत पोलिसांनी माल जप्त केला. मांजा, चक्री, पतंग, बंडल आदी मिळून ३० लाख ४५ हजार ४५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यावर गुरूवारी रोडरोलर फिरवत तो सर्व नष्ट करण्यात आला.
Ashish Deshmukh : वहीनी 26 हजार मतांनी पडल्या, पण साहेब दुप्पट मतांनी पडले असते !
महाराष्ट्र पोलीस स्थापना सप्ताह-२०२५ (रेजिंग डे) अंतर्गत परिमंडळ ३ मधील पोलीस ठाण्यांनी ही कारवाई केली. पाचपावली, शांतीनगर, कोतवाली, गणेशपेठ व तहसील हद्दीतीतून पोलिसांनी हा माल जप्त केला होता. मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा, प्लास्टिक पतंग, चक्री, मांजाचे बंडल आदी जप्त केले होते. विविध पोलिस ठाण्यांतर्गत पोलिसांनी छापेमारीतून हा मुद्देमाल जप्त केला.
The school is responsible for the safety of the students : खासगी बसने शालेय सहलीला परवानगी !
दरम्यान, पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल मांजा, चक्री, बंडल, पतंग आदी संदर्भात न्यायालयाचे आदेश प्राप्त झाले. त्यानंतर परिमंडळ ३ च्या पोलीस उपायुक्त महक स्वामी यांनी मोकळ्या जागेत मांजा, चक्री बंडल आदी असा ३० लाख ४५ हजार ४५५ रुपयांचा मुद्देमालावर रोलर फिरविण्यात आला. यानंतर डम्पिंग यार्ड येथे सर्व मुद्देमाल नष्ट करण्यात आला.