Nagpur Police : ज्याने मनोबल वाढवावे, त्यानेच केले शोषण !

Psychiatrist sexually abused women : मानसोपचार तज्ञाचा महिलांवर लैंगिक अत्याचार

Nagpur नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात गेल्या १५ वर्षांपासून मानसोपचार तज्ञ म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने अनेक मुली, तरुणी आणि विवाहित महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आरोपी मानसोपचारतज्ञाने उपचाराच्या नावाखाली महिलांच्या अश्लील चित्रफिती तयार केल्या. त्यांना ‘ब्लॅकमेल’ करीत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. ज्याने रुग्णांचे मनोबल वाढवावे, अशा मानसोपचार तज्ज्ञानेच शोषण केल्याने मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे.

आरोपी राजेश याने हुडकेश्वर परिसरात १५ वर्षांपूर्वी मानसोपचार क्लिनिक सुरू केले होते. तेव्हापासून तो अनेक महिलांवर उपचार करीत होता. परंतु त्याच्या विकृत वृत्तीचा परिणाम म्हणून त्याने अनेक अल्पवयीन मुली, तरुणी आणि विवाहित महिलांशी अश्लील चाळे करायला सुरुवात केली. नैराश्यात असलेल्या पीडित महिलांनी हा प्रकार सहन केला. त्याने छायाचित्र आणि Video काढले होते.

Maharashtra Kesari Wrestling Tournament : राजकीय आखाड्यासाठी गाजलेल्या देवळीत आता खरीखुरी कुस्ती

राजेशने क्लिनिकमध्ये आणि सहलीच्या निमित्ताने हॉटेल किंवा फार्महाऊसवर पीडित महिलांवर लैंगिक अत्याचार केले. त्याने अश्लील चित्रफिती इंस्टाग्रामवर टाकण्याची धमकी देऊन महिलांना ब्लॅकमेल केले. गेल्या काही दिवसांपूर्वी एक पीडित महिला हुडकेश्वर पोलीस ठाण्यात पोहोचली. तिची अश्लील छायाचित्रे व्हायरल केल्याबद्दल तक्रार केली. ज्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला आणि राजेशचे नाव समोर आले.

Sudhir Mungantiwar : चंद्रपुरातून सुरू होणारी ‘क्लायमॅट चेंज’ चळवळ देशव्यापी व्हावी !

पोलिसांनी राजेशला अटक केली आणि त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. त्याच्या संगणकात शेकडो अश्लील चित्रफिती आढळल्या आहेत. आरोपी राजेशची पत्नीही त्याच्या या कुकृत्यात समाविष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ती सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तक्रारीला उशीर का?
गेल्या अनेक दिवसांपासून महिलांचे शोषण करणाऱ्या राजेशची तक्रार करायला एवढा उशीर का झाला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. आज मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली आहे. मुली बोलायला लागल्या आहेत. महिला स्वतःहून अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवत आहेत. अशा परिस्थितीत एवढे दिवस महिलांनी अन्याय सहन करणे दुर्दैवी मानले जात आहे.