Breaking

Nagpur Police : तिचा ओरडण्याचा आवाज आला… लोकांना वाटले अपहरण !

Screaming in the car, people thought it was a kidnapping in Nagpur : कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट

Nagpur एका कारमधून तरुणीचा ओरडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे अपहरणाची शंका लोकांना आली. त्यांनी कपीलनगर पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या घटनेला गांभीर्याने घेतले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारचा पाठलाग केला. तरुणांना ताब्यात घेतले. त्यांनी आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी असून फिरायला जात असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तरुणीसह सर्वांना समज दिली आणि सोडून दिले. मात्र, या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली होती.

दोघेही बीएस्सी व्दितीय वर्षाला आहेत. ते चांगले मित्र आहेत. सायंकाळच्या सुमारास दोघेही कारने फिरायला निघाले. मित्र असल्याने त्यांच्यात गंमती-जमती आणि आरडा-ओरड सुरू होती. कार भरधाव वेगात कपीलनगर परिसरातून जात असताना ती अचानक ओरडली. तरूणीचा आवाज ऐकून नागरिकांना तिचे अपहरण झाल्याचे वाटले. स्थितीही तशीच होती. परिसरात तिच्या अपहरणाची चर्चा परसरली.

Kite Festival : तर एका झटक्यात होईल जीवाचा ‘ओ काट’!

या घटनेसंदर्भातील माहिती कपीलनगर पोलिसांपर्यंत पोहोचली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेच ‘बीट मार्शल’ अश्वीन जाधव यांना सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सांगितले. त्या माध्यमातून पोलीस पथकाने कार शोधली. कार चालक आणि मैत्रिणीची विचारपूस केल्यानंतर ही केवळ गम्मत आहे. आम्ही चांगले मित्र आहोत, हे शब्द ऐकल्यावर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.

Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, ‘पोस्टर लावून मतं मिळत नाहीत’

पोलिसांनी त्याला समज देऊन यानंतर रस्त्यावर असा प्रकार व्हायला नको असे बजावून सांगितले. परंतु, परिसरात अपहरणाची चांगलीच चर्चा रंगली होती. ते अपहरण नसले तरी सूचना मिळताच पोलीस घटनेची गांभीर्याने दखल घेतात की नाही, हे या घटनेवरून स्पष्ट झाले. कपीलनगर पोलिसांनी सतर्क असल्याचा हा परिचय दिला आहे. या प्रकारामुळे पोलिसांचा जीव मात्र भांड्यात पडला होता.