Breaking

Nagpur Police : सायबर गुन्हेगारांची कोटीच्या कोटी उड्डाणे !

The number of cyber criminals has increased fivefold : पाचपटींनी वाढ; लोकांच्या एटीएम कार्डवर मिळवला ताबा

Nagpur ‘तुम्हाला एक ओटीपी आला असेल तो आम्हाला सांगा’, ‘एक अॅप डाऊनलोड करा, तुमचे रजिस्ट्रेशन कम्प्लीट होईल’ असं सांगणारे कॉल्स हल्ली वाढले आहेत. लोक सजग झाले आहेत. पण तरीही भोळ्या-भाबड्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे अशा कॉल्सला लोक बळी पडतात आणि लाखो रुपये गमावून बसतात. त्यामुळे सायबर गुन्ह्यांची संख्या पाचपटींनी वाढली आहे. तर कोट्यवधी रुपये त्यांनी लोकांच्या खात्यातून काढून घेतले आहेत.

देशात चार वर्षांत सायबर गुन्हेगारीत पाचपट वाढ झाली आहे. देशभरातील २९ हजार बँक खात्यातून तब्बल १ हजार ४५७ कोटी रुपये सायबर गुन्हेगारांच्या घशात गेले. ही माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरुन समोर आली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत यातील पाच टक्क्यांपेक्षा कमी गुन्ह्यांची उकल झाली आहे.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंची प्रशासनावरील पकड ठरेल फायद्याची ?

सायबर गुन्हेगारांचे देशभरात जाळे पसरले असून अनेक राज्यातील उच्चशिक्षित तरुण सायबर गुन्हेगारांच्या टोळीत सहभागी आहेत. दिल्ली, जामतारा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, नोएडा, कोलकाता आणि पंजाबमधील या टोळ्यांनी पोलिसांनाही जेरीस आणले आहे. सायबर गुन्हेगारांनी तब्बल ६६ राष्ट्रीयकृत, खासगी बँकांच्या हजारो ग्राहकांच्या खात्यातून कोट्यवधी रुपये परस्पर काढले.

२०१९-२० मध्ये देशभरात १२९ कोटींची फसवणूक करण्यात आली. त्यात एक लाखापेक्षा जास्त रक्कम गमावणाऱ्या २६७७ बँक ग्राहकांचा समावेश आहे. २०२०-२१मध्ये ११९ कोटींची फसवणूक झाली. त्यात २५४५ नागरिकांची एका लाखापेक्षा जास्त रक्कम गमावली. २०२१-२२ या वर्षात १५५ कोटींची फसवणूक झाली. यावर्षी फसवणूक झालेल्यांमध्ये ३५९६ लोकांचा समावेश आहे. २०२२-२३ या वर्षात २७७ कोटींची फसवणूक झाली. त्यात ६६९९ जणांना सायबर गुन्हेगारांनी गंडा घातला.

२०२३-२४ मध्ये सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीच्या वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करुन १४५७ कोटी रुपयांनी फसवणूक केली. त्यात एक लाखांपेक्षा जास्त रक्कम गमावणाऱ्यांची संख्या २९ हजार १८२ एवढी आहे.

Sudhir Mungantiwar : पर्यावरणाचा गोवर्धन उचलण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता !

सायबर गुन्हेगारांनी देशभरात सेक्स्टॉर्शन, ॲप डाऊनलोड फ्रॉड, लिंक फ्रॉड, इत्यादींच्या माध्यमातून २७७ कोटी रुपयांची फसवणूक केली. ६ हजार ६९९ एवढ्या जणांची एका लाखांपेक्षा जास्त रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ही फसवणूक करताना सायबर चोरट्यांनी क्रेडिट कार्ड, एटीएमचा पासवर्ड किंवा भ्रमणध्वनीवर ताबा मिळवला.