The police sub-inspector gave the contract of neighbor’s murder : अटक होताच प्रकृती बिघडली; एक दिवसाची कोठडी
Nagpur ६२ वर्षांच्या वृद्धावर हल्ला झाला. त्यात ते जखमी झाले. फुटेजच्या आधारावर आरोपींना पकडण्यात आले. त्यांची कसून चौकशी झाली तेव्हा शेजाऱ्यानेच सुपारी दिल्याचे उघडकीस आले. त्याहून मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा सुपारी देणारा पोलीस उपनिरीक्षक असल्याचे पुढे आले. आरोपीला ताब्यात घेताच त्याची प्रकृती बिघडली. मात्र उपचारानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. आता त्याला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
नागपूर सुधार प्रन्यास NIT मध्ये तक्रार केल्याच्या रागातून निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने सुपारी देऊन एका वृद्धाच्या हल्ल्याचा कट रचला. राजाराम ढोरे (६२) रा. नागसेन सोसायटी, मानकापूर असे मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्यासोबत या कटात सामील अब्दुल वसीम अब्दुल सलीम (४१) रा. छावनी, अनिल जेम्स चोरे (३२), अनिकेत उर्फ निक्की बहादुरे (२७) दोन्ही रा. मेकोसाबाग आणि अभय (२०) यांनाही अटक केली आहे. सुरेश प्रल्हाद सोनटक्के (६५) रा. नवीन मानकापूर असे जखमीचे नाव आहे.
Instagram Love story : अडिच वर्षांपूर्वी घर सोडून गेली, बाळासोबत परतली!
मुख्य आरोपी राजाराम ढोरे हा शहर पोलीस खात्यातून पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाला आहे. फिर्यादी सोनटक्के हे महावितरणमधून निवृत्त आहेत. नागसेन सोसायटीत सोनटक्के, ढोरे आणि ढोरेचा जावई हे शेजारी आहेत. ढोरेच्या घराजवळ रिकामी जागा आहे. जावयाने त्या जागेवर अतिक्रमण करून झुंबा क्लास सुरू केले होते. ढोरेची मुलगी झुंबा वर्ग चालवायची. गाण्यांच्या आवाजामुळे सोनटक्के यांना त्रास होत होता.
त्यांनी अनेकदा ढोरेला याबाबत सांगितले होते, मात्र तो दुर्लक्ष करीत होता. त्यामुळे कंटाळून सोनटक्के यांनी नासुप्रकडे तक्रार केली. या प्रकारामुळे ढोरे नाराज होता. त्याने सोनटक्के यांना धडा शिकवण्यासाठी कट रचला. अब्दुल वसीमला २० हजार रुपयांत सोनटक्केची सुपारी दिली. अब्दुल वसीमने अनिल, अनिकेत आणि अभयला योजना सांगितली.
Food & Drugs Department : उपवास करताय? भगरीमध्ये असू शकते बुरशी!
१७ फेब्रुवारीला सोनटक्के पालकमंत्री बावणकुळे यांच्याकडे तक्रार करण्यासाठी दुचाकी वाहनाने रवीभवन येथे जात होते. वसीम व त्याच्या साथीदारांनी सोनटक्केचा पाठलाग सुरू केला. अनिकेत आणि अभय एका दुचाकीवर तर अब्दुल आणि अनिल दुसऱ्या वाहनावर होते. सोनटक्के हे प्रोव्हिडन्स स्कूल मार्गाने जात असताना अनिकेतने त्यांच्या डोक्यावर लाकडी दंड्याने हल्ला चढविला. मात्र, त्यांनी वार हुकविल्याने हातावर लागला. आरडा ओरड होताच आरोपी पळून गेले.
रस्त्याने जाणारे लोक गोळा झाले. त्यांनी जखमीला सदर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी वृद्धावर हल्लाची घटना गंभीरतेने घेतली. फुटेजच्या आधारावर पोलिसांनी वसीम आणि त्याच्या साथीदारांचा शोध लावला.