Breaking

Nagpur police : दोन हत्याकांडांनी हादरली उपराजधानी

The series of murders continues in the home minister’s city : पोलिसांचा उरला नाही वचक, खूनांची मालिका सुरूच

Nagpur गृहमंत्र्यांच्या शहरात हत्याकांडाची मालिका नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात अद्यापही सुरुच आहेत. एकाच रात्रीत दोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली आहे. नागपूर पोलिसांचा वचक संपल्यामुळे शहरात गँगवार सुरु झाले आहे. युवकाचा सेवादलनगरात जवळपास ३० जणांनी दगडांनी ठेचून खून केला तर कारागृहातून सुटून आलेल्या गुन्हेगाराचा गुंडांच्या टोळीने चाकूने भोसकून खून केला. हे दोन्ही हत्याकांड बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडले.

अमोल बहादूरे (३२, सेवादलनगर, भांडेप्लॉट) असे खून झालेल्या बीट्स गँगच्या सदस्याचे नाव आहे. तर अमोल वंजारी (२२, वाठोडा) असे वाठोड्यात खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पहिल्या घटनेत, बीट्स गँगचा सदस्य अमोल पंचम बहादूरे याने गेल्या आठ वर्षांपूर्वी तिरंगा चौकात एका युवकाचा भरचौकात खून केला होता. तेव्हापासून त्याचा तिरंगा चौकात दबदबा होता. तेव्हापासूनच तो खंडणी आणि भूखंड बळकावण्याचे काम करीत होता. त्याने दोन साथीदारांच्या मदतीने मुरुम आणि अन्य खनिज विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. तसेच त्याचा व्याजाचा अवैध व्यवसाय आहे. त्यासाठी त्याने घोगलीमध्ये अलिशान कार्यालय घेतले होते. पैशावरुन अमोलचा कुख्यात दिनेश गायकीसोबत चिमणाझरी येथील खदानीवरून वाद सुरु होता.

Drinking water scheme : सदोष पाइपलाइन फुटली, गावात कृत्रिम पाणीटंचाई

आठ दिवसांपूर्वीच दिनेश गायकी हा कारागृहातून सुटून आला. अमोलने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे दिनेश चिडून होता. दिनेशने प्रवीण ढिंगे, शुभम हटवार, प्रतिक गाठे यांच्यासह जवळपास ३० साथीदार सेवादलनगरात गोळा केले. त्यांनी अमोलला फोन करुन तेथे बोलावले. रात्री ११.३० वाजता अमोल दोन साथीदारांसह कारने तेथे पोहचला. अमोलच्या कारला आरोपींनी घेराव घातला. घाबरलेला अमोल कारमधून बाहेर निघत नव्हता. त्यामुळे आरोपींनी त्याच्या कारच्या चारही बाजुच्या काचा फोडून त्याला बाहेर खेचून काढले. भरचौकात त्याचा दगडाने ठेचून खून केला. तर त्याचा साथीदार अमित भुसारी व बंटी यांना गंभीर जखमी केले.

रात्री उशिरा सक्करदरा पोलिसांनी घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळावरुन मृतदेह मेडिकलमध्ये रवाना केला. या प्रकरणी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला असून अद्याप एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही.

Chandrashekhar bawankule: वंचितांपर्यंत योजना पोहोचणारच नाही तर त्यांचा अर्थच काय?

वाठोडा येथे खून
वाठोड्यात दहशत असलेल्या अमोल कृष्णराव वंजारी (२२, भांडेवाडी, गोंड मोहोल्ला) याचा वस्तीतील गुंड एस प्रधान राजन उईके ऊर्फ गब्बर याच्याशी वाद सुरु होता. दोघांमध्ये वस्तीतील वर्चस्वावरून वाद सुरू होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अमोलने जीवे मारण्याची धमकी दिली. गब्बरवर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी गब्बरने वाठोडा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अमोलला अटक केली. दोनच दिवसांपूर्वी अमोल कारागृहातून सुटून आला. गब्बरला जीवाची भीती होती. त्यामुळे त्याने तेजस मेंढे आणि दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने अमोलचा काटा काढण्याचा कट रचला. बुधवारी रात्री त्याने तीन लोकांच्या मदतीने डम्पिंग यार्डच्या भींतीजवळ बसलेल्या अमोलला गाठले. चौघांनीही चाकूने हल्ला करुन अमोलचा खून केला.