Thief found with the help of CCTV : ऐन दुपारी घरात शिरून महिलेला लुटले, असुरक्षितता वाढली
Nagpur उपराजधानीत कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. पोलिसांचा वचक संपल्याचेही चित्र आहे. भरदिवसा एका महिलेच्या घरात शिरून तिला चोराने लुटले. पोलिसांनी या चोराला सीसीटिव्हीच्या मदतीने शोधून काढले आहे.
आरोपी दिवसा एका महिलेच्या घरात घुसला. चाकूच्या धाक दाखवून आरोपीने वृद्ध महिलेचे तोंड दाबून ठार मारण्याची धमकी दिली व गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. ही घटना खरे टाऊन, धरमपेठ येथे घडली. सीताबर्डी पोलिसांनी चोवीस तासाच्या आत आरोपीला अटक केली. सागर तिवारी (२०) (जयताळा) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी पळून जाताना सोनसाखळी लोखंडी गेटला अडकली व त्याचे दोन तुकडे झाले. सहा ग्रॅमचा तुकडा तो घेऊन पळाला तर उर्वरित ९ ग्रॅम घटनास्थळीच पडली. आरोपी पळून गेल्यानंतर वृद्ध महिलेने आरडाओरड केली. जवळपासचे लोक जमा झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सीसीटीव्ही तपासले. आरोपीच्या छायाचित्रावरून त्याला प्रतापनगरातून अटक केली. त्याच्या ताब्यातील सोनसाखळी आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे, सागरने चोरी करण्याच्या आधी घराची टेहळणी केली होती. खरे टाऊन येथे राहणाऱ्या फिर्यादी संजीवनी देशपांडे (८१) यांना एक मुलगा आणि दोन मुली आहे. मुली विवाहित असून त्या सासरी असतात. मुलगा अधिकारी असून तो इंदूरला राहतो. वृद्ध महिला एकट्याच राहतात. आरोपी सागरचे वडील फळ विक्रेता आहे. त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहे.
Maharashtra Traffic police : वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून घ्यायचे आहेत २ हजार ४२९ कोटी रुपये!
दुपारच्या सुमारास फिर्यादी घरी निवांत बसल्या होत्या. आरोपी तोंडाला रुमाल बांधून त्यांच्या घराजवळ गेला. दुचाकी पार्क केली आणि गेट उघडून त्यांच्या घरी गेला. नितनवरे कुठे राहतात, अशी विचारणा करीत तो घरात शिरला. अनोळखी व्यक्ती थेट घरात आल्यामुळे फिर्यादी संतापल्या. ‘तू घरात कसा काय आलास?’ असा प्रश्न त्यांनी विचारताच आरोपीने त्यांचे तोंड दाबले. त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅमची सोनसाखळी हिसकावली.








