Outside the cafe, the youth clashed with the police : कॅफेच्या बाहेर रात्री बारा वाजता गोंधळ; तीन तरुणांवर गुन्हे दाखल
Nagpur मेट्रो सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नागपूरमध्ये आता मुंबईसारखे NightLife बघायला मिळते. रात्री उशिरापर्यंत पब आणि कॅफेच्या बाहेर तरुणांची गर्दी होत असते. यात मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात असते. सिव्हिल लाइन्स येथील एका कॅफेबाहेर काही मुलं उभी होती. यात मुलीही होत्या. पोलिसांनी ‘रात्रीचे बारा वाजले आहेत, मुलींनो घरी जा’, असा सल्ला दिला. पण पोलिसांना हलक्यात घेतले गेले. नंतर पूर्ण ताफा दाखल झाला तेव्हा मात्र सिट्टी पिट्टी गुम झाली.
सिव्हील लाईन्समधील खोका कॅफेजवळ एका तरुणीने चक्क दोन साथीदारांच्या मदतीने रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलसोबत अरेरावी केली. त्यांना धक्काबुक्की केली. या तरुणांनी नकली पोलीस असल्याचा दावा करत कॉन्स्टेबलविरोधात खोटी तक्रार करण्याची धमकीदेखील दिली.
Centenary year of RSS : संघाच्या शताब्दी वर्षाचे प्लानिंग कर्नाटकमध्ये!
स्वप्नील विष्णू कांबळे (२५, बीकेव्ही शाळेजवळ), सागर मन्नूसिंह ठाकूर (२६, सुरेंद्रगड, सेमिनरी हिल्स) व एक तरुणी असे तीन आरोपी आहेत. सिव्हिल लाईन्समधील सीबीआय कार्यालयासमोर खोका कॅफे आहे. रात्री उशिरापर्यंत या कॅफेजवळ तरुणांची गर्दी असते. सदर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पंकज नंदेश्वर रात्री बाराच्या सुमारास होमगार्ड रवीसोबत सिव्हिल लाईन्समध्ये गस्त घालत होते. दोघेही खोका कॅफेजवळ पोहोचले. कॅफेजवळ अंधाऱ्या भागात ८ ते ९ तरुण बसले होते.
पोलिसांनी त्यांना तेथून जायला सांगितले. जवळच एक तरुणी मॅगी खात होती. ‘खूप उशीर झाला आहे, तू तुझ्या घरी जा,’ असे नंदेश्वर यांनी तिला म्हटले. यावरून तिने वाद घालण्यास सुरुवात केली. स्वप्नील आणि सागरदेखील तिथे पोहोचले. ‘तुम्ही बनावट पोलिस आहात’ असा आरोप त्यांनी लावला. नंदेश्वर यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तुमच्याविरोधात खोटी तक्रार करून वरिष्ठांपर्यंत जाऊ अशी धमकी त्यांनी दिली.
तसेच पोलिसांना धक्काबुक्की केली. आरोपींनी त्यांच्या दुचाकीची चाबी काढण्याचादेखील प्रयत्न केला. अखेर नंदेश्वर यांनी वरिष्ठांना माहिती दिली व अतिरिक्त कुमक बोलविली. ते पाहून आरोपी तेथून फरार झाले. नंदेश्वर यांच्या तक्रारीवरून तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.