Breaking

Nagpur Zilla Parishad : नागपूर जिल्हा परिषदेचे मिशन Hundred days!

Aim to complete office work in minimum time : कमीत कमी कालावधीत कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याचे लक्ष्य

Nagpur नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM DEVENDRA FADNAVIS यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने १०० दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. यामध्ये कमीत कमी कालावधीत कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

नागरिकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाइन सेवांची सज्जता आणि सर्व कार्यालयांची सर्वंकष स्वच्छता मोहीम यावर भर देण्यात आला आहे. या सर्वांची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी यांच्या बैठकीत दिले आहेत.
याअंतर्गत त्यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा व तालुकास्तरावरील सर्व अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक वेबसाइटवर अद्ययावत करण्याचे निर्देश दिले.

Nagpur Improvement Trust : काय सांगता? नासुप्रची इमारत पाडणार ?

तसेच वेबसाइटवर प्राप्त होणाऱ्या आरटीआयच्या तक्रारी तात्काळ निकाली काढण्यावर भर देण्याची सूचना केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील सर्व कार्यालय व परिसराची स्वच्छता करण्याचेदेखील त्यांनी निर्देश दिले आहेत.

तक्रारींवर ३० दिवसांत कार्यवाही

कार्यालयीन रेकॉर्डचे वर्गीकरण करावे वापरात नसलेले जुने साहित्य, जुनी वाहने निर्लेखीत करणार. जिल्हा परिषदेकडे प्राप्त होणाऱ्या पीजी पोर्टल, आपले सरकार पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर ३० दिवसांत कार्यवाही करायची आहे.

Women unsafe in Nagpur, Nagpur Police : महिला वकिलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार !

वसतिगृहांची तपासणी करणार

विभाग प्रमुख व गट विकास अधिकारी यांनी नियमित फिल्ड व्हिजीट कराव्यात. भेटीदरम्यान आरोग्य केंद्र,पशुवैद्यकीय दवाखाना, अंगणवाडी केंद्र तसेच समाजकल्याण विभागांच्या शाळा तसेच वसतिगृहांची तपासणी करणार आहे.

सौजन्याने वागा
कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांसाठी भेटीचा दिवस व वेळ नमूद असलेला फलक त्यांचे कार्यालयाबाहेर लावावा. अभ्यागतांसाठी बसण्याची व्यवस्था कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे समाधान व सौजन्याने वागणूक द्यावी. लोकशाहीदिन कार्यक्रमात प्राप्त होणाऱ्या तक्रारींची विभागाने नोंद घेऊन कार्यवाही करून अनुपालन सादर करावे.

MIHAN : ‘एमएडीसी’कडे कंपन्यांची अपडेटेड यादीच नाही !

तर सत्कार होईल
केंद्र शासन व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. जे गट विकास अधिकारी, विभागप्रमुख, आरोग्य अधिकारी व ग्रामसेवक १०० दिवस कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत करण्यात सातत्य ठेवतील, त्यांचा सत्कार करण्यात होईल.